Drugs Crime esakal
नाशिक

Nashik Crime: शहरात एमडी नसल्याचा दावा करणारे पोलीस तोंडघशी; वडाळ्यातील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शिंदेगावानजिकच्या औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या एमडी ड्रग्जचा (मॅफेड्रॉन) कारखानाच उदध्वस्त करीत सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींचा साठा मुंबई पोलिसांनी पकडला.

त्यामुळे खडबडून जाग आलेल्या नाशिक शहर गुन्हेशाखेने वडाळ्यातून एमडी ड्रग्ज जप्त करीत महिलेसह एकाला अटक केली.

दोघांना येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई-पुण्यानंतर नाशिकमधून एमडी ड्रग्जचे नेटवर्क सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

तर, शहरात एमडी ड्रग्ज नसल्याचा छातीठोक दावा करणारे शहर पोलीस मात्र या कारवाईमुळे तोंडघशी पडले आहेत. (Cops claim no MD in city Two arrested in Wadala drug case Nashik Crime)

वसीम रफीक शेख (३६), नसरीन उर्फ छोटी भाभी इन्तीयाज शेख (३२, रा. सादिकनगर, वडाळा गाव) अशी वडाळ्यातून अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.

गुरुवारी (ता.५) रात्री उशिरापर्यंत शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक व युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

गेल्याच आठवड्यात पुण्याच्या ससुन हास्पिटलमध्ये दाखल असताना एमडी ड्रग्ज्‌चे रॅकेट चालविणारा व मूळचा नाशिकचा असलेला ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला.

त्याचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी थेट नाशिकमध्ये येऊन शिंदे गावातील एमडी ड्रग्जचा कारखानाच उदध्वस्त केला. मात्र त्याचा कानोकान खबर नाशिक पोलिसांना लागू दिली नाही.

यामुळे खडबडून जाग आलेल्या नाशिक पोलिसांनी वडाळागावात त्या मानाने ‘किरकोळ’ कारवाई केली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे यांना एमडीची माहिती मिळाल्यावर सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे युनिट दोनचे निरीक्षक रणजित नलावडे यांची मदत घेत सहायक निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक अश्विनी उबाळे,

अंमलदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, गणेश भामरे, विनायक आव्हाड, नितीन भालेराव, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब नांद्रे, अर्चना भड यांनी धाड टाकत पथकाने वडाळा गावातील एका झोपडीतून ५४.४ ग्रॅम एमडीसह एक किलो गांजा असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

मध्यरात्रीनंतर विक्री; पोलीसही तोंडघशी

वडाळागावातील एमडीचा बाजार बिनबोभाट सुरू होता. मात्र तरीही शहर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. शहरात ड्रग्जमाफिया वाढले असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह उच्चभ्रुंना त्यांचे ग्राहक होते.

मध्यरात्री दोन-तीननंतर वडाळ्यात विक्री सुरू व्हायची. संशयित महिला ही स्वत: ड्रग्जच्या आधीन होती. तिचे हायप्रोफाईल व्यक्तीशी कनेक्ट असल्याने तिच्यावरील कारवाईला ‘ब्रेक’ लागत असल्याची चर्चा आहे.

या कारवाईवेळीही तिची ‘सुटका’ करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यात आला. परंतु आधीच नाचक्की झाल्याने पोलिसांनी दबाव झुगारून कामगिरी केल्याचे बोलले जात असले तरी सापडलेल्या एमडीच्या साठ्याबाबत साशंकता व्यक्त होते आहे.

असे असले तरी आत्तापर्यंत शहरात एमडी नसल्याचा छातीठोक दावा करणारे शहर पोलीसच तोंडघशी पडल्याचे समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT