पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला वीस हजार पाचशे रुपये भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दुगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर, पुण्यातील खेड, मंचर येथून पालेभाज्यांची आवक होत असते. (Coriander price at 20 thousand five hundred rupees at nashik market committee Nashik Latest Marathi News)
सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. साईधन व्हेजिटेबल कंपनीत नवळपाडा (ता. दिंडोरी) येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघीरे हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबिरीस वीस हजार पाचशे रुपये शेकडा बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापाऱ्याने घेतली. मुंबई, गुजरात, सुरत येथील मार्केटला ते पाठविणार आहेत.
"माझे पाऊणेसहा एकर क्षेत्र आहे. पावसाने बरेच नुकसान झाले आहे. मी माझ्या शेतीत सद्यःस्थितीत कारले, कोथिंबीर, टॉमेटोची लागवड केली आहे. आज कोथिंबीरस मिळालेला बाजारभाव यामुळे माझ्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटते."
- विनायक वाघिरे, शेतकरी, नवळपाडा, दिंडोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.