मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे पस्तीस गावे आजपर्यंत कोरोनामुक्त आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजपर्यंत या गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
मूलवड (जि. नाशिक) : मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे पस्तीस गावे आजपर्यंत कोरोनामुक्त आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजपर्यंत या गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता फेब्रुवारीतच कोरोना संकटाचे नियोजन केले होते. (corona has been evicted from 35 tribal villages including mulwad due to public awareness)
जनजागृती व लवकर उपचार ठरले महत्वाचे
गावोगावी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती, वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर, बाहेर गावाहून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून घेणे, सॅनिटायझरचा वापर करणे, प्रत्येक गावातील आशावर्करमार्फत स्त्रियांचे प्रबोधन, प्रत्येक गावात जाऊन आरोग्य तपासणी, लक्षणे जाणवताच तत्काळ उपचार करणे या विषयी जागृती केली. या भागातील जनतेने आरोग्य विभागाला प्रतिसाद देत कोरोना नियमांचे पालन करत शिस्तीचे ही पालन केले. तसेच या भागातील नागरिक किरकोळ आजारासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा ही वापर करतात. या गोष्टींच्या जोरावर मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्राने जवळपास पस्तीस गावे कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळवले. डॉ. पाटोळे यांनी सांगितले, की, या भागातील लोक जास्तीत- जास्त शारीरिक कष्टाची कामे करतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी व रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. वेळोवेळी कोरोनाविषयी जनजागृती व लवकर उपचार करण्यामुळे ही गावे आजपर्यंत कोरोना मुक्त आहेत.
(corona has been evicted from 35 tribal villages including mulwad due to public awareness)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.