नाशिक : काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वाटत होते. मात्र, ग्रामीण भागात रुग्णसंख्या पुन्हा हळूहळू वाढत आहे. बुधवारी (ता. २३) जिल्ह्यात आढळलेल्या ३३८ पॉझिटिव्हपैकी २३६ पॉझिटिव्ह नाशिक ग्रामीण भागातील आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास ग्रामीण भागात निर्बंध कठोर होण्याची शक्यता आहे. (corona update 338 new corona positive reported in nashik district)
मंगळवारी (ता. २२) जिल्ह्यात आढळलेल्या १८३ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १२८ बाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील होते. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी ग्रामीण क्षेत्रात शंभराहून अधिक पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यात ३३८ पॉझिटिव्ह आढळले. त्यात ग्रामीणमध्ये २३६, नाशिक महापालिका क्षेत्रात ९६, मालेगावला दोन, तर जिल्हाबाहेरील चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात १३६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. चार बाधितांचा मृत्यू झाला. यात नाशिक ग्रामीणमधील तीन, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील एका मृताचा समावेश आहे. पोर्टलवर अद्याप नोंदी सुरू असून, ६९ मृतांच्या नोंदी झाल्या. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३९, तर नाशिक ग्रामीणमधील ३० मृतांचा समावेश आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत ८९३ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमध्ये ३८१, मालेगावला ३०७, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील २०५ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात ५७७ रुग्ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५३४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात एक, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३०, तर मालेगावच्या दहा रुग्णांचा समावेश आहे.
(corona update 338 new corona positive reported in nashik district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.