corona corona
नाशिक

येवला शहराने रोखले पण, ग्रामीण भागात पाय पसरलेलेच!

संतोष विंचू

येवला (नाशिक) : दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्याने तालुक्यात कोरोनाची (Corona) दहशत काहीशी दूर झाली आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात रुग्ण निघतच असल्याने चिंता लागून आहे. येवला शहराने गेल्या महिन्यापासून कोरोनावर नियंत्रण आणले असून, सध्या तर एकच रुग्ण शिल्लक आहे. याउलट ग्रामीण भागात आजही २० रुग्ण असून, १५ गावे कोरोनाग्रस्त आहेत. समाधानाची व दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १०९ गावे कोरोनामुक्त झाल्याने प्रशासनाने मोठा सुस्कारा सोडला आहे. (Corona update spread of corona is in control at Yeola city)


पहिल्या लाटेत शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कदाचित यामुळेच अनेकांच्या अँटीबॉडी तयार झाल्या. लसीकरणही झाल्याने दुसऱ्या लाटेत शहरवासियांनी रुग्ण संख्येवर चांगले नियंत्रण मिळविले. याउलट पहिल्या लाटेत निर्धास्त असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत प्रचंड हादरला होता. एकमेव कौटखेडे गाव सोडले तर सर्व १२३ गावात रुग्ण आढळले. किंबहुना मृत्यूची संख्याही वाढली होती. आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वत्र दिलासा मिळत असून, शहरवासियांनी मिळवलेले नियंत्रण कौतुकास्पद मानले जात आहे.


या महिन्याच्या १ तारखेपासून शहरात केवळ १० बाधित निघाले. तेथेच हा आकडा ग्रामीण भागात ८८ इतका आहे. विशेष म्हणजे शहरात दोन-तीन दिवसातून एखादा रुग्ण आढळतो. तेथे ग्रामीण भागाचा रोजचा आकडा चार ते पाचपर्यंत निघत आहे. प्रशासनाचे प्रयत्न व ग्रामस्थांनीही दिलेली साद यामुळे आजमितीस १०९ गावे कोरोनाग्रस्त मुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या शहरात एक तर ग्रामीण भागात २० रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर म्हणजे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील मृत्यूची संख्या प्रचंड वाढली आहे. शहराचे एकूण मृत्यू ५१ असताना ग्रामीण भागाचा हाच आकडा १७६ वर पोहोचला आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्या १ हजार ३५६ वर राहिली. तर, ग्रामीण भागाचा आकडा ४ हजार ३९ वर पोहोचला आहे.



रोजची गर्दी चिंता वाढवणारी…
शहरासह ग्रामीण भागात नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर येत असून, वाढलेली गर्दी पुन्हा चिंतेचे कारण बनत आहे. रोजच बाजारपेठेतील यात्रेसारखी गर्दी पुन्हा रुग्ण वाढविण्यास निमंत्रण तर देणार नाही ना, ही भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातही अशी स्थिती असली तरी खरिपाच्या कामामुळे संपर्क टळत आहे. ग्रामीण भागात एकेरी संख्येने का होईना पण, रोजच रुग्ण निघत असल्याने प्रशासनासह नागरिकही चिंतेत आहे.


महसूल, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून तालुक्याने कोरोनावर नियंत्रण आणले आहे. यापुढेही नागरिकांनी दक्षता घेऊन रुग्ण संख्या वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आता २१ रुग्ण ॲक्टिव्ह असून, शून्यावर आणण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे.
- प्रमोद हिले, तहसीलदार, येवला

रुग्ण संख्या आवाक्‍यात येत असून, १०९ गावे कोरोनामुक्त झाली आहे. इतर पंधरा गावेदेखील कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागात सध्या २० रुग्ण उपचार घेत असून, सर्व तालुका कोरोनामुक्तीसाठी सर्वांचेच एकोप्याने प्रयत्न सुरू आहे.
- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, येवला


तारीखनिहाय ग्रामीण भागातील रुग्णसंख्या
४ - १६
५ -७
७ - ७
८ - ३
९ - ६
१० - ३
११ - ८
१२ - ६
१३ - ५
१४ - ४
१५ - ३
१६ - ४
१७ - ३
१८ - ५

येवल्या तालुक्यातील आकडे...
- एकूण रुग्ण - ५३९५
- बरे झालेले - ५११४
- एकूण मृत्यू - २२९
- उपचार घेणारे - २१
- एकूण रॅपिड टेस्ट - १९६८८
- एकूण स्वॅब टेस्ट - ८५२३

(Corona update spread of corona is in control at Yeola city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT