corona vaccination  sakal
नाशिक

कोरोना लसीकरणासाठी सटाण्यात ‘लकी ड्रॉ’

सामाजिक कार्यकर्ते फारूख तांबोळी यांचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : मुस्लिम समाजातील घटकांच्या कोरोना लसीकरणास प्रोत्साहन म्हणून लकी ड्रॉ योजना राबविण्यात येणार आहे. यात विजेत्यांना मुख्याधिकारी नितीन बागूल व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांच्या हस्ते पहिले बक्षीस म्हणून ११ हजार रुपये, दुसरे बक्षीस पाच हजार रुपये, तिसरे तीन हजार, तर चौथे व पाचवे बक्षीस प्रत्येकी ११०० रुपये देण्यात येणार आहेत. या उपक्रमात कुठलाही राजकीय हेतू नसून, लसीकरणासारख्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, हा पवित्र हेतू असल्याचे अजंठा मंडपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते फारूख तांबोळी यांनी शुक्रवारी (ता. १२) येथे स्पष्ट केले.

दरम्यान, कोरोना लस घेणे म्हणजे एक राष्ट्रीय कार्य आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस दिली जात आहे. देशहित व मानवधर्म समजून मुस्लिम समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन समाजहित जोपासावे, असे आवाहनही श्री. तांबोळी यांनी केले.

मुस्लिम समाजात कोरोना लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजुती व एकूणच जनमाणसावर होणारा दुष्परिणाम यासाठी मुस्लिम समाजात जागृती मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात झालेल्या मुस्लिम समाज मेळाव्यात ते बोलत होते. श्री. तांबोळी म्हणाले, की शनिवारी (ता. १२) दुपारी चारपासून शहरातील ६० फूटी रस्त्यालगत तांबोळी स्टोअर्सजवळ समाजातील सर्व घटकांसाठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मुस्लिम समाजामध्ये कोरोनाबाबत खूप सारे गैरसमज आहेत. लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हा जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.

आपल्या सभोवतालचा कोरोना संसर्ग कमी होऊन सर्वसामान्यांचा जीव वाचविण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कोरोना लसीकरणासाठी तालुक्यातील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, बागलाण पंचायत समितीतील आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचा लाभ प्रत्येकाने घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. तांबोळी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT