election esakal
नाशिक

लाटेत निवडून आलेले अनेक नगरसेवक स्मृतिआड!

दत्ता जाधव

पंचवटी (जि.नाशिक) : महापालिका निवडणुकीच्या इतिहासात एक-दोन अपवाद वगळता आजपर्यंत कोणतीही निवडणूक (election) कोणत्याही पक्षाच्या लाटेवर झालेली नाही. अशा लाटेवर स्वार झालेल्या व पुढे मतदारराजाशी संबंध न ठेवलेल्या अनेकांना पुढील निवडणुकीत निवडून येणे सोडाच आपली अनामत रक्कमही वाचविता आले नसल्याचे दिसून आले आहे. (corporators elected in nashik muncipal corporation election)

वेगवेगळ्या मार्गाने ‘फिल्डिंग’ लावणे सुरू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आगामी निवडणूक कधीही होवो, मात्र पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनेकांनी आतापासूनच वेगवेगळ्या मार्गाने ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. शहरात आजपर्यंत एकदा मनसेची, तर एकदा भाजप लाटेवर विजयी झालेले अनेक नवखे उमेदवार ‘जायंट किलर’ ठरले. मात्र आपल्या वॉर्डात किंवा प्रभागातील नागरिकांपासून फटकून वागणारे अनेकजण नाशिककरांच्या स्मृतिआड गेल्याचा इतिहास आहे. महापालिकेच्या २०१२ ला झालेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने चांगलाच दबदबा निर्माण करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. या निवडणुकीत भल्याभल्यांना चितपट करत या पक्षाचे तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आले होते. पुढे त्यातील अनेकांनी मतदारांशी संपर्क न ठेवल्याने २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाचे केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील व जनतेची नाळ ठेवलेले वजनदार नगरसेवकच विजयी झाले. त्यानंतर २०१७ मध्ये आलेल्या भाजप लाटेत या पक्षाचे तब्बल ६६ नगरसेवक विजयी होऊन महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कोणा एका पक्षाला बहुमतापर्यंत घेऊन गेले होते.

आता लाट कोरोनाची

महापालिकेच्या इतिहासात २०१२ आणि त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या दोन्ही निवडणुका लाटेवरच झाल्या आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्या टर्ममध्ये पंचवटीतील मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक मुर्तडक यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रंजना भानसी यांना पक्षाने संधी दिली. आता पुढील वर्षीच्या सुरवातीला होणाऱ्या या निवडणुकीत मात्र केवळ ‘कोरोना’चीच लाट दिसून येत असल्याने मतदार कोणाला संधी देतात, हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.

जायंट किलर हवेतच

लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही कोणा एका विशिष्ट पक्षाची लाट येते. लाटेमुळे किरकोळ व नवख्या उमेदवारांमुळे भल्याभल्यांना पराभवाला सामोरे जावे लागते. असे जायंट किलर ठरलेले अनेक नगरसेवक निवडून दिलेल्या मतदाराजाशी संपर्क न ठेवता पाच वर्षे हवेतच राहतात, मात्र पुढील निवडणुकीत मतदार त्यांना त्यांची जागा दाखवत असल्याचा इतिहास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT