नाशिक : शहरात तीन महिन्यांपासून सुरळीत सुरू असलेल्या लसीकरणाची घडी विस्कळित झाली आहे. लसीकरणासाठी टोकन पद्धत सुरू झाल्याने पहाटेपासून प्रामाणिकपणे रांगा लावून असलेल्यांना परत फिरावे लागते, तर नगरसेवकांसह समर्थकांना केवळ टोकण असल्यामुळे लस मिळत आहे. त्यामुळे तीन-तीन महिने होऊनही अनेक ज्येष्ठांना दुसऱ्या लससाठी रोज मनस्ताप सोसावा लागतो आहे. (corporators supporters get preference for vaccine at the Municipal Vaccination Centers in Nashik)
आतापर्यंत वयोवृद्धांसाठी लसीकरण सुरू होते. आता १८ ते ४५ वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण चालू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. लसपुरवठा पूर्वीइतकाच असताना ज्येष्ठासोबत आता तरुणांची गर्दी वाढली. सहाजिकच लस घेण्यासाठी डोस कमी आणि घेणारे जास्त, अशी स्थिती झाली आहे. लोक पहाटेपासून लसीकरण केंद्रावर पाणी, नाश्ता बरोबर घेऊन येतात. काही केंद्रावर लसीकरणापूर्वी रॅपिड टेस्ट केली जाते व टोकन दिले जाते. नंतर लसीकरण केले जाते. महापालिका कर्मचारी त्यांचे कामकाज करतात, परंतु त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांची माणसे पाठवून कामात हस्तक्षेप करतात.
केंद्राचा अघोषित ताबाच
सामान्यांना नोंदणी करावी लागते, तर नगरसेवकांच्या आप्तेष्टांना मात्र विनानोंदणी लस मिळते. नंबर लावण्याची गरज पडत नाही. लोकप्रतिनिधींचा फोन आला की लगेच लस दिली जाते. असा मनमानी कारभार लसीकरण केंद्रावर पाहायला मिळतो. लोकप्रतिनिधींनी शासकीय लसीकरण केंद्राचा अघोषित ताबाच घेतल्याने पहाटेपासून लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीस नंबर जवळ आल्यावर लस संपल्या, उद्या या, परवा या, असे सांगितले जाते. नियम पाळून लस घेणाऱ्यांना हेलपाटे आणि नियम तोडून वशिल्याने येणाऱ्यांचे लसीकरण, अशी कारभार सुरू झाला आहे.
(corporators supporters get preference for vaccine at the Municipal Vaccination Centers in Nashik)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.