IAS Bhagayshree Banayat esakal
नाशिक

Nashik: NMCत आयुक्तांकडून पदानुक्रमात ‘करेक्शन’! प्रशासन, नगर नियोजन व गुण नियंत्रण विभाग अधिकार कक्षेत

सकाळ वृत्तसेवा

: महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी यापूर्वी नस्ती मंजुरीसाठी ठरवून दिलेली पद्धत रद्द केली असून, नगर नियोजन, प्रशासन, ड्रेनेज व पाणीपुरवठा माहिती व तंत्रज्ञान गुणनियंत्रण आदी महत्त्वाचे विभाग स्वतःकडे ठेवले आहे.

या संदर्भात अधिकारी वर्गात खुसपुस असली तरी नियमानुसार पदानुक्रम केल्याचा दावा बानाईत यांनी केला. यावरून यापूर्वीची पद्धती नियमानुसार असल्याचे स्पष्ट होते. (Correction in hierarchy by commissioner in NMC Administration Town Planning and Quality Control Department under jurisdiction Nashik)

महापालिकेच्या कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त (सेवा) व अतिरिक्त आयुक्त (शहर) ही दोन पदे कार्यरत आहे. अतिरिक्त आयुक्त (सेवा) या पदाचा कार्यभार भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी भाग्यश्री बानाईत यांच्याकडे आहे, तर अतिरिक्त आयुक्त (शहर) या पदाचा कार्यभार उपजिल्हाधिकारी संवर्गातील प्रदीप चौधरी यांच्याकडे आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांच्याकडे वैद्यकीय व आरोग्य हे दोन विभाग आहेत तर नगर नियोजन, नगररचना, प्रशासन पाणीपुरवठा व बांधकाम हे महत्त्वाचे विभाग वगळता उर्वरित सर्व विभाग अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे सोपविण्यात आले.

विभागांच्या वाटपानुसार विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केले जातात. त्यानंतर आयुक्तांची मंजुरी घ्यावी लागते. तर आयुक्तांशी संबंधित विभागांच्या नस्ती थेट आयुक्तांकडे मंजुरीला जातात.

अतिरिक्त आयुक्त (सेवा) या पदावर कार्यरत असलेल्या बाणायत यांच्याकडे प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (सेवा) या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी कार्यरत असताना यापूर्वी करण्यात आलेली कामकाज व खाते वाटपांची विभागणी अग्राह्य ठरत असल्याचा दावा करत कामकाजाची नवीन कार्यपद्धतीचे आदेश आज काढले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे आहे नवीन विभागांचे वाटप

महापालिकेत आयुक्त पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होते. त्या खालोखाल सध्या दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याने संबंधित खातेप्रमुख, विभागप्रमुख किंवा विभागीय अधिकारी यांच्याकडून आलेल्या नस्ती अतिरिक्त आयुक्त त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अतिरिक्त आयुक्तांकडे येतील.

त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातील असे आदेशित करण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय प्रशासकीय सेवेतील अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीनंतर आयुक्तांकडे मंजुरीसाठी नस्ती जातील.

या आदेशाची काटेकोर पालन अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बाणाईत यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

आयुक्तांकडे असलेले थेट विभाग

नवीन अध्यादेशानुसार प्रशासन, नगर नियोजन, ड्रेनेज व पाणीपुरवठा, माहिती व तंत्रज्ञान, गुणनियंत्रण आदी विभागांची सर्व प्रकरणे, नस्ती व संचिका भारतीय प्रशासन सेवेतील अतिरिक्त आयुक्तांकडून थेट आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचना आहेत.

सध्या अतिरिक्त आयुक्त (सेवा) व आयुक्त पदाचा पदभार भाग्यश्री बानाईत यांच्याकडे असल्याने सर्वाधिकार त्यांच्याकडे एकवटले आहे.

"दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक जिल्हाधिकारी संवर्गातील, तर दुसरे भारतीय प्रशासन सेवेतील आहे. त्यामुळे पदानुक्रम निश्चित होणे आवश्‍यक आहे. मी काढलेले आदेश नियमानुसार आहे. यानिमित्ताने पदानक्रम निश्चित झाला आहे." - भाग्यश्री बानाईत, आयुक्त तथा प्रशासक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT