SPPU university esakal
नाशिक

Nashik: भ्रष्टाचाराचे आरोप अन् गैरव्‍यवहारांच्या फैरी; पुणे विद्यापीठ व्‍यवस्‍थापन परिषद बैठकीत सदस्‍य संतप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेच्या बैठकीत भरतीतील कथित गैरव्‍यवहारासह अन्‍य विविध विषयांवर खडाजंगी झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठराविक सदस्‍यांच्‍या मनमानी कारभाराविषयी नाराजी व्‍यक्‍त करीत अन्‍य सदस्‍यांनी यासंदर्भात ताशेरे ओढल्‍याचे समजते. (Corruption allegations and malpractices round Members angry at Pune University Management Council meeting Nashik)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व अन्‍य विविध विद्यार्थी संघटनांना विद्यार्थी हिताच्या आंदोलनासाठी दिल्‍या जाणाऱ्या धमक्या, अपमानजनक वागणुकीवरून व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांना फैलावर घेतले.

निविदांपासून बदल्यांपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर ठराविक सदस्यांकडून होत असलेल्या मनमानी, हस्तक्षेपामुळे सदस्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केल्‍याचेही समजते.

व्‍यवस्‍थापन परिषदेच्या बैठकीत सदस्‍यांनी विविध मागण्या केल्‍याचीही माहिती मिळते आहे. यात जी-२० सह गेल्या चार महिन्यांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काही सदस्‍यांनी केली आहे.

३० कोटींच्‍या ‘हाउस कीपिंग ठेक्यात कुणाला रस आहे? एकाच ठेकेदाराला फायदा होण्यासाठी कुणाची धडपड सुरू आहे,’ असे अनेक प्रश्‍न सदस्‍यांनी उपस्‍थित केल्‍याचे समजते. व्यवस्थापन परिषदेला अंधारात ठेवून २७ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य बेकायदेशीररीत्या लाखोंचे पगार देत २० वर्षांसाठी सेवेत कायम करण्याच्या उद्योगाबाबत विचारणा करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्‍यान, प्रामाणिक कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत कायम असल्‍याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात आली. संबंधित ठरावाबाबत अनुमोदक व सूचक असल्‍याचे संबंधित व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍यांनाच कल्‍पना नसल्‍याचा अजब प्रकारही समोर आणण्यात आला आहे.

यातून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्‍याने दुखावलेल्‍या ज्‍येष्ठ सदस्यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती मिळत आहे. दरम्‍यान, विद्यापीठाच्‍या कामकाजावर बैठकीत ताशेरे ओढल्‍यावर आता कथित आरोपांवर काय कारवाई होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

"पुणे विद्यापीठाचे काम व्यक्ती नाही, विद्यार्थी केंद्रित असावे. विद्यार्थी, परीक्षा, शिक्षण संस्थांशी निगडित विषयांना सर्वांत महत्त्व दिले जावे, अशी आमची भूमिका आहे. व्यवस्थापन परिषद हे विद्यापीठाचे उच्चाधिकार मंडळ असून, त्यामुळे सदस्यांच्या बैठकीत झालेल्या वादग्रस्त विषयांची चर्चा जाहीरपणे करायची नाही. हा विद्यापीठाचा अंतर्गत विषय असून, शिक्षण घटकांतून निवडून आलेल्या सदस्यांचे आक्षेप, तक्रारी कुलगुरूंकडे सभेत जाहीर केल्या आहेत. त्‍यांच्‍यावर आमचा विश्वास असून, ते योग्य कार्यवाही करतील, अशी अपेक्षा आहे."

- सागर वैद्य, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT