Amol Pawar and the villagers present while giving a statement to the Group Development Officer Lata Gaikwad regarding the investigation and action taken against the corruption in the Dalit Settlement Improvement Scheme. esakal
नाशिक

Nashik Corruption News : कुऱ्हेगावच्या दलितवस्ती सुधार योजनेत चौदा लाखांचा भ्रष्टाचार!

सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या रस्त्याच्या कामात सुमारे चौदा लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरपीआय कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना निवेदन देत दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडेही तक्रार दाखल करून उपोषणाचा इशारा दिला आहे. (Corruption of fourteen lakhs in Koregaon Dalit settlement improvement scheme nashik news)

राजवाडा परिसरात सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते ग्रामपंचायतीने शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेतून बनविले आहेत. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सुमार दर्जाची असून जमिनीवर साधी मलमपट्टी देऊन रस्ते तयार करण्यात आले आहेत.

सरपंच, पदाधिकारी व ठेकेदारांचे संगनमत असून, त्यांना संपूर्ण बिले अदा करू नये, बिले रोखवावीत; अन्यथा शासकीय पैशांचा अपव्यय होउ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे. येत्या आठ-दहा दिवसांत संबंधित दोषींवर कारवाई करावी; अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

या संपूर्ण प्रकरणाची आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी कुऱ्हेहेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूरगाव ग्रामपंचायतीचे काही विद्यमान सदस्यदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली.

"आमच्याकडे कुऱ्हेगावच्या ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. रस्त्याच्या कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविला जाईल. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल."

-लता गायकवाड, गटविकास अधिकारी, इगतपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT