cost for water bank is 3 and half lakh and subsidy is given one and half lakhs nashik news esakal
नाशिक

Sakal Exclusive : वॉटर बँकेचा गवगवा गावभर अन अनुदान कवडीमोल! खर्च साडेतीन लाखावर अन अनुदान केवळ 'इतके'

संतोष विंचू

Sakal Exclusive : वॉटर बॅंक अर्थात शेततळे शेतकऱ्यांना फलदायी ठरली असून दुष्काळी तालुक्याला वरदान ठरल्याने कोरडवाहू शेती यामुळे बागायती होत आहे. शेततळ्यासाठी शासनाच्या अनुदान योजनेचाही मोठा लाभ होताना दिसतोय.

मात्र शेततळे खोदणे व प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी साडेतीन ते साडेचार लाखाच्या दरम्यान खर्च येत आहे.

त्या तुलनेत दोन्ही मिळून अनुदान केवळ दीड लाखापर्यंत मिळत असल्याने वाढती महागाई विचारात घेता या अनुदान वाढीची मागणी होत आहे. (cost for water bank is 3 and half lakh and subsidy is given one and half lakhs nashik news)

वॉटर बॅंकेला अवर्षणप्रवण, दुष्काळी असलेल्या तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प असल्याने बागायती शेती फुलविण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. किंबहुना येवला, सिन्नर, चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव आदी दुष्काळी तालुक्यात तर गावागावात शेकडो शेततळे तयार झाले आहे.

मध्यंतरी दोन अडीच वर्षे अनुदान नसल्याने अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून खिशातून स्वखर्चाने शेततळ्याची कामे करावी लागली होती. सरकारने पुन्हा मागेल त्याला शेततळे योजनेला गती दिली आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे शेततळे आता महागडे ठरत आहे. पूर्वी दीड-दोन लाखात होणारे शेततळे आता चार ते साडेचार लाखापर्यंत पोहोचले असल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी वाढली आहे.

नाव सोन्याबाई हाती...

शेततळे खोदण्यासाठी आकारमानानुसार १८ ते ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतोय. मात्र ३० × ३० × ३ मीटरचे म्हणजेच १०० फुटाचे शेततळे खोदण्यासाठी मुरमाड जमिनीत एक लाखाच्या आसपास खर्च येतो.जर खोदताना शेत जमिनीत खडक लागला तर ब्लास्टिंग देखील करून दगड फोडावे लागतात.

परिणामी हा खर्च दीड लाखापर्यंत देखील जातो, त्यातुलनेत अनुदान मात्र ७५ हजारच रुपये मिळत असल्याने २५ ते ७५ हजार रुपये खिशातून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्लॅस्टिक अच्छादन आवाक्याबाहेर!

प्लॅस्टिक आच्छादनासाठी ५० टक्के किंवा ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सर्वात मोठ्या ३० × ३० × ३ मीटरच्या तळ्याला सर्वाधिक ७५ हजार रुपये अनुदान मिळते. सध्या प्लास्टिक कागदाचे ९० ते १२५ रुपयाच्या दरम्यान प्रति मीटरचे दर आहे. या हिशोबाने एका तळ्याला दोन ते अडीच लाख रुपये प्लस्टीक कागदाला लागतात.

याशिवाय कागद टाकण्यापूर्वी तळ्याचे सपाटीकरण, कागद दाबणे, कडेने सुरक्षक कंपाउंड करणे, पाणी टाकण्यासाठी पाईपलाईन अन काढण्यासाठी तळ्यात जलपरी टाकणे आदी छोट्या मोठ्या कामांना मिळून हाच खर्च तीन ते साडेतीन लाखापर्यंत पोहोचतो. त्या तुलनेत अनुदान केवळ ७५ हजारच मिळत असल्याने शेततळे खोदणे सोपे पण कागद टाकणे अवघड झाल्याचे शेतकरी सांगतात.

शेततळ्याला असा येतो खर्च

(आकार - ३० × ३० × ३)

शेततळे खोदकाम - १ ते १.५० लाख

सपाटीकरण मजुरी - १५ ते २० हजार

संरक्षक कंपाऊंड - ४० ते ६० हजार

प्लॅस्टिक कागद - २ ते अडीच लाख

पाईपलाईन,जलपरी, विजजोडणी व इतर खर्च - ३० ते ५० हजार

असे खोदकाम, असे अनुदान

आकारमान - शेततळे - प्लॅस्टिक

२०×१५×३ - २६७७४ - ३१५९८

२०×२०×३ - ३८४१७ - ४१२१८

२५×२०×३ - ५००६१ - ४९६७१

२५×२५×३ - ६५१९४ - ५८७००

३०×२५×३ - ७५००० - ६७७२८

३०×३०×३ -७५००० - ७५०००

"बेभरवशाचे पर्जन्यमान अन पिकांना हक्काचे पाणी नसणे, या परिस्थितीत शेततळे शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. हक्काने उन्हाळी पिके देखील घेता येत आहेत. शेततळ्याना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे महागाई व होणाऱ्या खर्चाचा विचार करून अनुदानात ७५ टक्कयापर्यंत वाढ करावी." -संभाजीराजे पवार, माजी सभापती, येवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Breaking News: भोसरीत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; कर्वेनगरमधून अटक केलेल्या चौघांची नावे काय?

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

IND vs NZ: पुण्यात कोरड्या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला? आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना

Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT