Gray cotton produced on city looms. esakal
नाशिक

Nashik News: कापूस, सूतदर घसरल्याने यंत्रमाग उद्योगाला पुन्हा झळाळी; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वस्त्रोद्योगात सातत्याने परिस्थिती बदलत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे कापड उत्पादन घटले आहे. याउलट बांगलादेशमध्ये विक्रमी उत्पादन झाले. त्यातच रशिया-युक्रेन युद्धाचा फॅक्टर यामुळे परिस्थिती बदलत आहे.

बांगलादेशने कापूस खरेदी बंद केल्याने देशातील कापूस व सूतदर घसरले आहेत. अशातच चीनचे उत्पादन कमी झाल्याने देशातील कापड उद्योगाला नवनवीन ऑर्डर मिळत असल्याने राज्यातील यंत्रमाग उद्योगाला झळाळी आली आहे.

शहरातील यंत्रमाग व्यवसायही यामुळे वधारला आहे. बंद पडलेले यंत्रमाग सुरु झाले असून कामगारांना तीनही शिफ्टमध्ये काम मिळाले आहे. येथील बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे. पूर्व भागातील विवाहसोहळ्यांमध्येही रौनक जाणवत आहे. (Cotton yarn prices fall loom industry again on fire position in international market Nashik News)

बांगलादेशमध्ये कापडाचे विक्रमी उत्पादन झाल्याने बांगलादेशने नवीन ऑर्डर घेणे बंद झाले आहे. कोरोना काळात बांगलादेशने मास्क, ॲप्रन, बेडशीट, गाऊन आदी उत्पादनांमध्ये बाजी मारली होती. येथील व्यवसायाला शासन व प्रशासनानेही मोठे सहकार्य केले. त्यातच बांगलादेशचे वीजदर व मजुरी कमी आहे.

त्यामुळे भारतीय कापडाची मागणी कमी झाली होती. बांगलादेशला ऑर्डरप्रमाणे उत्पादन शक्य नसल्याने व चीनमध्ये उत्पादन घटल्याने देशाला नवीन ऑर्डर मिळू लागल्या आहेत. यातच भारत व कापूस उत्पादक उझबेकिस्तान येथील कापूस व सूतदर घसरल्याने यंत्रमाग व्यवसायाला दिलासा मिळाला आहे.

वाढीव वीजदर व नियमित वीजपुरवठ्याची समस्या मात्र, कायम आहे. शहरात रोज सुमारे एक लाख गाठ कापूस सूत लागते. देशातील तयार मालात प्रामुख्याने ५८ टक्के कापड भारतात वापरले जाते. तर ४२ टक्के कापड निर्यात होते.

गेल्या अनेक वर्षानंतर देशातील वस्त्रोद्योगाला झळाळी मिळाली असल्याने केंद्र व राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाने ही संधी साधून यंत्रमाग उद्योग स्थिरस्थावर राहण्यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार यंत्रमाग व्यवसायातून मिळतो. येथील कामगारांना रोज सुमारे सहाशे ते आठशे रुपये मिळत आहेत. गेल्या वर्षी एक शिफ्टमध्ये सुरु असलेले यंत्रमाग तीनही शिफ्टमध्ये सुरु आहेत.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

कापडाचे दर स्थिर

गेल्या वर्षी ३० नंबर सुताचा दर प्रतिकिलो ३३० ते ३४० रुपये झाला होता. कापसात विक्रमी दरवाढ झाली होती. यामुळे कापड उत्पादन घटले होते. यावेळी हाच सूतदर २३५ रुपये प्रतिकिलो मिलमधील घाऊक भाव आहे.

यावर वाहतूक खर्च, हमाली व अन्य खर्च वेगळा आहे. आजवर सूतदरात ३० ते ३५ टक्के घसरण झालेली नव्हती. कापडाचे दर स्थिर असल्याने वाढीव मजुरी व वीज दराचा फटका सूत दरात भरून निघत आहे.

"मागील वर्षी १७५ किलोचा कापूस गठाणचा दर एक लाख रुपयापर्यंत गेला होता. यावेळी बाजारात ६० ते ६२ हजार रुपये कापूस गठाणचा दर आहे. सूत दरामध्ये ३५ ते ४० टक्के घसरण झाली आहे. शेतकऱ्यांनी कापसाचे दर घसरल्याने कापूस साठा केला असला तरी आगामी काळात भाव वाढीची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षी विक्रमी दरवाढ झाल्याने अनेक यंत्रमाग बंद झाले. काही यंत्रमाग चालकांनी कॉटन बंद करून पीसी (पॉलिस्टर) व रोटो उत्पादन सुरु केले. आता बंद पडलेले यंत्रमागही नव्याने सुरु झाले आहेत. त्यातच गेल्या वर्षीचा माल साठा शिल्लक नसल्याने यंत्रमाग व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत."

- महेश पाटोदिया, यार्न मर्चन्टस, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT