नाशिक

Nashik Bribe Crime : जीएसटी महिला अधिकाऱ्याला लाचप्रकरणी न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : दोन वर्षांपासून बंद कंपनीचा व्यवसाय कर रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून चार हजारांची लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली.

स्नेहल सुनील ठाकूर (५२, रा. आश्विन नगर नाशिक) असे लाच घेतलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. स्नेहल यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

तक्रारदार यांची सिक्युरिटी सर्विसेस कंपनी दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे कंपनीचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी त्यांनी १३ सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. व्यवसायकर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजारांची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पडताळणीअंती विभागाने सापळा रचला.

त्यानुसार बुधवारी (ता.२०) कार्यालयात पंचासमोर ठाकूर यांनी तक्रारदाराकडून तडजोड करीत चार हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाकूर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

गुरुवारी (ता.२१) ठाकूर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या घरझडतीतही काहीही आढळून आले नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT