नाशिक : अल्पवयीन युवतीला फूस लावून तिचे अपहरण झाल्याचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये सातत्याने दाखल होतात. पण, अशाच एका गुन्ह्यात अल्पवयीन युवतीने तिच्या पालकांनी केलेल्या आरोपांना फेटाळून लावत, आपले अपहरण नव्हे तर पित्यासोबत झालेल्या वादातून घर सोडल्याची साक्ष न्यायालयात दिली. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित युवकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. (court has acquitted youth suspect in crime of abduction Nashik Latest Crime News)
याप्रकरणी जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात ८ मे २०२१ ला गुन्हा दाखल झाला होता. यात युवकाविरुद्ध अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याची फिर्याद युवतीच्या वडीलाने दिली होती. ग्रामीण पोलिसांनी तपास करीत अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन युवतीसह संशयित युवकाला शोधून आणले. संशयित युवकाला अटक करण्यात आली. न्यायालयात जून २०२२ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
त्यानंतर सदरील दावा जिल्हा व सत्र न्यायाधीश कु. सं.ना. भालेराव यांच्यासमोर सुनावणी आली असता, त्यांनी जलदगतीने सदरचा खटला चालविला आणि अवघ्या १३ दिवसात खटल्याचा निकाल देत संशयित असलेल्या युवकाची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. रवींद्र निकम तर प्रतिवादीतर्फे ॲड. अक्षय कलंत्री यांनी युक्तिवाद केला.
साक्ष ठरली महत्त्वाची
युवकाने अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष न्यायालयात साक्ष देताना अल्पवयीन युवतीने आपण स्वत:हून घर सोडले होते. संशयित युवकाशी आपले प्रेमसंबंध तिने मान्य केले. मात्र त्यांच्या कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध तिने नाकारले होते. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने वडिलांशी झालेल्या वादातून आपण घर सोडल्याचे तिने न्यायालयात सांगितले.
याबाबत चार साक्षीदारांचे जाबजबाब घेण्यात आले. त्यानुसार, न्यायालयाने अवघ्या १३ व्या दिवशी निकाल देत सदरील युवकाची निर्दोष मुक्तता केली. यामुळे काही वर्षांपूर्वी तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या एका दिवसात सत्र खटल्याचा निपटारा केलेला होता, त्याची आठवण न्यायालयीन वर्तुळात ताजी झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.