The experiment of crab farming is successful by dattatray nathe esakal
नाशिक

Nashik News : खेकडा पालनाचा प्रयोग यशस्वी; निसर्गाच्या भरवश्यावरील पारंपारिक शेतीला शोधला पर्याय

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : कहांडळवाडी (ता. सिन्नर) येथील शेतीचं गणीत पावसाळ्यातील निसर्गाच्या भरवश्‍यावर अवलंबून आहे. त्यामुळे पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून इथल्या दत्तात्रय चांगदेव नाठे या तरुणाने खवय्यांसाठी खेकडा पालनासाठी गुंतवणूक केली. वडिलोपार्जित शेतातील पाच गुंठ्यात त्यांनी दहा टन क्षमतेचा प्रयोग यशस्वी केलायं. त्यांच्या खेकड्याला जागेवर चारशे रुपयांचा भाव मिळतोय. (Crab farming experiment successful alternative to traditional agriculture relies on nature at sinnar Nashik News)

श्री. नाठे आणि पत्नी मंगल यांनी २००९ मध्ये पुण्यात पॅथॉलॉजिकल लॅब सुरु केली. हा व्यवसाय सांभाळात मांसाहरींसाठीच्या आवडत्या खेकड्यांच्या पालनाचा प्रयोग श्री. नाठेंनी फत्ते केला. गावाकडील चार एकर शेती सुरवातीपासून बेभरवशाचे उत्पन्न देणारी होती. सालदाराकडून शेतीत मिळणारे तोकडे उत्पन्न उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकत नसल्याने श्री. नाठे यांनी खेकडा पालनाचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला. त्यासाठी त्यांनी पुण्यात हा व्यवसाय करणाऱ्या मित्रांचे प्रोत्साहन मिळाले.

वावी-तळेगाव रस्त्यालगत असलेल्या कहांडळवाडी गावातील शेतात पाच गुंठ्यावर श्री. नाठे यांनी दहा फूट खोलीचा सिमेंट काँक्रीटचे बांधकाम असलेला भूमीगत हौद बांधला. त्यात विहीर खोदताना निघालेला दगड-मातीचा मलबा, शेतातील मुरूम-माती भरून घेतली. खेकडा पालनासाठी हौदामध्ये पाण्यापेक्षा चिखल महत्त्वाचा असल्याने ही व्यवस्था करण्यात आली. हौदाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर चारीबाजूने लोखंडी तारांचे संरक्षक कुंपण करण्यात आले. पक्षांनी प्रवेश करू नये यासाठी संपूर्ण पाच गुंठे क्षेत्राला जाळीचे आच्छादन करण्यात आले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

रत्नागिरीतून मागवले बीज

गावरान वाण असलेल्या काळ्या पाठीचा खेकडा श्री. नाठे यांनी पैदाशीसाठी निवडला. रत्नागिरी धरणामधून निवड पद्धतीने एक टन बीज ६०० रुपये किलो दराने खरेदी केले. त्यात निम्मे नर व निम्म्या गरोदर माद्या असे प्रमाण होते. हे सर्व बीज टप्प्याटप्प्याने हौदात सोडण्यात आले. महिनाभरापासून प्रत्यक्ष उत्पन्न काढणीला सुरुवात झाली. सायंकाळच्या वेळी टोपलीमध्ये सुकट अथवा मांसाहारी पदार्थाचा एखादा तुकडा टाकून खेकडे पकडण्यासाठी सापळा लावला जातो.

टोपलीमध्ये खेकडे अन्न खाण्याच्या आमिषाने येऊन बसतात. सकाळी टोपल्याबाहेर काढून विक्री योग्य खेकडे बाजूला काढले जातात. इतर पिल्ले पुन्हा हौदात सोडण्यात येतात. साधारणपणे २०० ते २५० ग्रॅम वजनाच्या खेकड्याची विक्री केली जाते. शिर्डी येथील एका हॉटेलमधून दिवसाआड ५० किलोची मागणी श्री. नाठे यांनी मिळवली आहे. शिवाय जागेवर दररोज चार ते पाच किलो खेकडे विकले जातात.

गुंतवणुकीच्या परतव्याची हमी

बारमाही शाश्वत उत्पन्न देणाऱ्या खेकडा पालन प्रकल्पासाठी ‘नाबार्ड'तर्फे अनुदान दिले जाते. श्री. नाठे यांना दहा टन क्षमतेच्या प्रकल्पाला साडेसात लाख रुपये खर्च आला. त्यापैकी तीन लाख रुपये त्यांना अनुदान मिळाले. येत्या सहा महिन्यात उरलेली गुंतवणूक निश्चितपणे परत मिळेल, असा विश्‍वास श्री. नाठे यांना वाटतो आहे. खेकडा पालनासाठी कमी मनुष्यबळ लागते. प्रकल्प राखण्यासाठी एक मनुष्य पुरेसा होतो. मृत मासे, मांसाचे निरुपयोगी तुकडे, मृत कोंबड्या हे खेकड्यांसाठी अन्न म्हणून दिले चालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT