Nashik Holkar Bridge : होळकर पुलाच्या जुना दगडी पूल आणि त्याला समांतर बांधलेला कॉक्रीटचा पूल अशा या पुलावरून एकेरी वाहतुकीची व्यवस्था आहे. दोन्ही बाजूला पायी जाणाऱ्यांसाठी असलेल्या पुलाच्या मार्गावर ठिकठिकाणी भेगा पडल्या असल्याने हा भाग धोकादायक झालेला आहे.
काही ठिकाणी पडलेल्या भेगा मोठ्या झालेल्या असल्याने त्यावरून जाणाऱ्यांना त्या ओलांडताना काळजी घ्यावी लागत आहे. (cracks on footpath of Nashik Holkar Bridge news)
होळकर पुलावरील दोन्ही बाजूच्या पायी जाणाऱ्यांच्या मार्गावर अशा भेगा पडलेले आहेत. जुन्या पुलाच्या मार्गावर पडलेल्या भेगातून तर खाली गोदापात्र सहज दिसते. या पुलावरून शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध व्यक्ती अशा अनेकांची पायी ये- जा सुरू असते.
त्यांच्या दृष्टीने या भेगा अडचणीच्या ठरत आहेत. काही भेगा तर इतक्या मोठ्या आहेत. की त्यात जर लहान मुलांचे पाय पडले तर पाय अडकतील इतक्या मोठ्या झालेल्या आहेत. लोकवस्ती, व्यवसाय, मंदिरे आणि पर्यटन आदी या पुलाच्या दोन्ही बाजूला असल्याने येथून स्थानिक नागरिक विविध कामांसाठी ये- जा करीत असतात.
व्यावसायिकांची दुकाने असल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक याच पुलावरून येतात. मंदिरात दर्शनासाठी व पर्यटनासाठी आलेल्या भाविकही याच पुलावरून येतात. त्यामुळे पुलावरून जशी वाहनांची वर्दळ सुरू असते, तशीच पायी ये- जा करणाऱ्यांचीही असते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अशा या पुलावर पडलेल्या भेगा अडचणीच्या ठरत असल्याने त्या बुजवून त्यावर डागडुजी करणे गरजेचे आहे. होळकर पुलावरच्या रेलिंगच्या जाळ्या तुटल्या होत्या. त्या जाळ्यावर तात्पुरत्या स्वरूपात तारा बांधण्यात आलेल्या होत्या.
तरी त्या धोकादायक वाटत असल्याने त्याच्या तक्रारी वाढल्याने या रेलिंगच्या तुटलेल्या जाळ्यांच्या जागी लोखंडी पाइपच बसविण्यात आले. त्यामुळे जाळ्याचा धोका राहिला नाही. मात्र, पायी जाण्याच्या मार्गावर असलेल्या भेगा अजूनही बुजविण्यात आलेल्या आहे. त्याही त्वरित बुजवून ही समस्या सोडविण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.