Crime esakal
नाशिक

Nashik Crime: प्रेयसीकडून खंडणी उकळणाऱ्याविरोधात गुन्हा; फोटो-व्हिडिओ व्हायरलची धमकी देत घेतले पैसे

याप्रकरणी संशयित प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दोन-चार वर्षे प्रेमप्रकरणानंतर प्रेयसीने वेगळी वाट धरली असता, संशयित प्रियकराने तिच्यासमवेतचे फोटो-व्हिडिओ तिच्या नातलगांना देण्याची धमकी देत प्रियसीकडून सुमारे चार लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संशयित प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime filed against extorting girlfriend Money taken by threatening photo video viral Nashik)

संतोष राजेंद्र आरोटे (२८), शुभम आरोटे (२५, दोघे रा. तामसवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पीडित प्रियसीच्या फिर्यादीनुसार, संशयित संतोष याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते.

मात्र नंतर तिने त्यांच्यातील प्रेमसंबंध संपविले होते. परंतु संशयित आरोटे याने तिला मेसेजद्वारे संपर्क साधत तिच्याकडे सातत्याने पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याच्याकडे असलेले फोटो व व्हिडीओ तिच्या वडलांना पाठविण्याची धमकी दिली.

तसेच, स्वत: आत्महत्त्या करण्याची धमकी देत त्याने २०१९ ते २०२३ यादरम्यान पीडितेकडून ४ लाख २८ हजार ६०० रुपये घेतले आहेत. तसेच, पीडितेचे लग्न ठरले असता, संशयिताने ते लग्न मोडण्यासाठीही प्रयत्न केले असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी अखेर पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT