Neelam Gorhe esakal
नाशिक

Nilam Gorhe: बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाहीत; विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

Nilam Gorhe : समान नागरी कायदा असो की राम मंदिर, अगदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भाषण झाले तरी त्या संदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भूमिका मांडायचे. मात्र, उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाहीत व निर्णयही घेत नसल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. (Criticism of Deputy Chairman Gorhe of Legislative Council on uddhav thackeray maharashtra politics nashik)

उपसभापती गोऱ्हे यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. या वेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर इतके दिवस काम केल्यावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विचार केला.

राज्यात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जात असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. मी कुठल्याही पदासाठी किंवा स्थान टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला नाही.

शिंदे योग्य मार्गावर असल्याने त्यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली. शिवसैनिक म्हणून व त्यातही महिला म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी चांगली संधी दिली. त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगगड व नाशिकला धार्मिक पर्यटनासाठी निधी मिळावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत.

आपत्ती, पुनर्वसन, रस्ते अपघात, महिला सुरक्षा, महिला धोरण यावर मी पुढे काम करणार आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांच्याबरोबर मी पुणे येथे मोठे काम केले आहे. त्यांच्या कामाचा मला अनुभव आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ते धडाडीने काम करतात. त्यांचा राज्यातील जनतेला व सत्ताधारी पक्षांना फायदा होईल. कायद्याने शिवसेना शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. माझ्यावर अविश्वास ठराव आणला जाणार असल्याची चर्चा होती.

मात्र, त्याला अर्थ नाही. उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाहीत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भूमिका मांडत होते. अगदी लाल किल्ल्यावर झालेल्या भाषणाचा उल्लेख करीत ते स्वतःची व पक्षाची भूमिका जाहीर करीत होते.

मात्र, सध्या उद्धव ठाकरे भूमिका मांडण्यात कमी पडतात, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, संपर्क नेते राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT