मालेगाव (जि. नाशिक) : दीपोत्सवात सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे झेंडुंच्या फुलांचे उत्पन्न घटल्याने दसऱ्याला घाऊक बाजारात फुलांचे दर किलोला ७० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. किरकोळ खरेदीसाठी ग्राहकांना किलोमागे किमान शंभर रुपये मोजावे लागले. दिवाळीत भाव आणखी वाढतील, अशी अपेक्षा असतानाच गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दसऱ्याच्या तुलनेने भाव ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. शिवाय फुलांचे नुकसानही झाले. (crop of marigold flowers afftected due to Returning rains Nashik Latest Marathi News)
चांदवड, मनमाड, दिंडोरी, कळवण व नाशिकच्या काही भागात झेंडुंच्या फुलांचे उत्पन्न घेतले जाते. पिकाला अति पावसाचा फटका बसला. झाडांची पुरेशी वाढ न झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. अतिवृष्टी झाल्यामुळे फुलांचे नुकसान झाले असून, दसरा- दिवाळीच्या हंगामात २५ ते ३० टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. फुलांचे उत्पादन घटल्यामुळे दसऱ्याला भाव वाढले होते. दसऱ्याला घाऊक बाजारात ७० ते ७५ रुपये किलोने विकले गेले.
दिवाळीला फुलांचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलांचे नुकसान झाले. चांगल्या दर्जाची झेंडुंची फुले ४० ते ५० रुपये किलोने विकली गेली. मध्यम प्रतिच्या फुलांचा भाव १५ ते २५ रुपये किलोदरम्यान होता. पावसात सापडलेली व नुकसान झालेली फुले पाच ते पंधरा रुपये किलोने घाऊक बाजारात विकण्यात आली.
किरकोळ बाजारात तेजी
अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झेंडुंच्या फुलांच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला. किरकोळ बाजारात मात्र फुलांचे भाव तेजीत होते. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला येथील बाजारात किरकोळ विक्रीचा दर ७० ते ८० रुपये किलो होता. मध्यम प्रतीची फुले ५० ते ६० रुपये किलोने मिळत होती. आदिवासी पट्ट्यातून काही शेतकरी बांधव शहरात फुल विक्रीसाठी आले आहेत. फुलांच्या माळा दहा रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत मिळत होत्या.
"या वर्षी दसऱ्याला फुलांचे चांगले उत्पादन आले. दिवाळीतही चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे फुलांचे नुकसान होवून भाव कोसळले. दसऱ्याच्या तुलनेने दिवाळीत निम्म्या किंमतीत फुले विकावी लागली. दिवाळीसाठी राखून ठेवलेल्या फुलातून उत्पादन खर्चही निघाला नाही."
- शिवाजी मोरे, फुल उत्पादक, देणेवाडी, चांदवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.