NMC News  esakal
नाशिक

NMC News : अतिरिक्त जलकुंभ उभारणीवर फुली; महासभेत प्रस्ताव फेटाळले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ठाणे शहर नाशिकच्या तुलनेत मोठे असून, तेथे अधिक पाणीपुरवठा होतो. असे असले तरी नाशिकमध्ये जवळपास दिडशे जलकुंभ आहे. ठाणे शहरात तेवढेही नाही. मात्र, कमी जलकुंभ असूनही पाण्याचे योग्य नियोजन होते.

नाशिकच्या लोकसंख्येचा विचार करता एवढ्या मोठ्या प्रमाणात जलकुंभाची खरोखर आवश्‍यकता आहे का, असा सवाल करताना यापुढे जलकुंभाच्या उभारणीवर आयुक्तांनी फुली मारली.

कामांच्या प्राधान्यक्रम ठरविताना मोकळे भूखंड बंदीस्त करण्याची आवश्‍यकता नसल्याच्या सूचना दिल्या. अंदाजपत्रकात कामाची नोंद आहे म्हणून ते काम केलेच पाहिजे असे नाही. गरज असेल तरच कामे करा, असा स्पष्ट सूचना डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या. (cross on construction of additional water tank proposal rejected in General Assembly Nashik News)

सकाळची बातमी

मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित महासभेच्या विविध विषयांना गुरुवारी (ता.१०) मंजुरी देण्यात आली. विषयांमध्ये जलकुंभ उभारणी तसेच मोकळे भूखंडांना संरक्षित कंपाउंड उभारण्याचा विषय पत्रिकेत होता.

पूर्व विभागातील मुंबई नाका येथील कालिका पंपिंग स्टेशन येथे वीस दशलक्ष लिटर्स क्षमतेचा पाच कोटी रुपये खर्च करून जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव होता. आयुक्त करंजकर यांनी शहरातील जलकुंभाच्या विषयाला हात घातला.

शहरात सद्यःस्थितीत दिडशे जलकुंभ आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलकुंभाची आवश्‍यकता नाही. ठाणे शहराच्या तुलनेत नाशिकमध्ये अधिक जलकुंभ आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास अधिक जलकुंभ उभारण्याची आवश्‍यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त करत आवश्‍यक असेल तरच तेथे खर्च करण्याच्या सूचना दिल्या.

पूर्व विभागातील प्रभाग सर्वे क्रमांक १०९ मधील गुरुदत्त सोसायटी परिसरातील महापालिकेच्या खुला जागेला संरक्षक भिंत बांधण्याबरोबरच मैदान विकसित करण्याचा विषय होता. खरोखरच आवश्‍यकता आहे का, असा सवाल करून बांधकाम विभागाच्या होऊ द्या खर्चाच्या भूमिकेला विरोध केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कामाची प्राथमिकता ठरवा

अंदाजपत्रकात कामासाठी आर्थिक तरतूद केल्यानंतर त्या कामाची खरोखरच आवश्‍यकता आहे, असे गृहीत धरून खर्च केला जातो. आयुक्त डॉ. करंजकर यांनी कामाची प्राथमिकता ठरविण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनावश्‍यक खर्चाला आळा घालणे गरजेचे आहे. देखभाल- दुरुस्तीच्या छोट्या कामांचे असंख्य प्रस्ताव सादर करण्याऐवजी दीड ते दोन कोटी रुपयांचे एक ते दोन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

‘सकाळ’ ने केले वास्तव उघड

जवळपास २२ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात ११८ जलकुंभ कार्यरत आहे. अतिरिक्त ३० जलकुंभांचे काम सुरू आहे. एकूण १४८ जलकुंभ असतानाही पाणीटंचाईच्या तक्रारी येतात.

त्याला कारण म्हणजे पाणीपुरवठा नियोजनाचा अभाव. यावर ‘सकाळ’ने जलकुंभ उदंड, तरीही पाण्याचा ठणठणाट या सदराखाली विस्कळित पाणीपुरवठा नियोजनाच्या विषयावर प्रकाशझोत टाकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT