Beggars waiting for devotees who bring food to Ramtirth. esakal
नाशिक

Nashik News: रामतीर्थावर भिकाऱ्यांची वाढली गर्दी! भाविक, पर्यटकांना नाशिकचे वेगळे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पवित्र तीर्थस्थानावर येणाऱ्या भाविकांकडून मिळणारे खाद्य आणि पैसे मिळण्याच्या आशेने रामतीर्थावर भिकाऱ्यांची गर्दी प्रचंड वाढ आहेत. स्मार्टसिटीअंतर्गत भिकाऱ्यांसाठी निवाराशेडची व्यवस्था करूनही भिकारी या निवाराशेडमधून पळ काढून पुन्हा मोकळ्या जागेत येत आहेत.

त्यामुळे गोदाकाठचे ते शेड रिकामेच आहेत. रामतीर्थ परिसरात भिकाऱ्यांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे आलेले गलिच्छपणा यामुळे भाविक आणि पर्यटकांना तीर्थस्थळाचे वेगळेच रूप बघायला मिळत आहे. (Crowd of beggars increased on Ramtirtha different vision of Nashik for devotees and tourists Nashik News)

धार्मिक स्थळांवर भिकाऱ्यांचा वावर वाढत आहे. भिकाऱ्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था इंद्रकुंड ते रामतीर्थ या रस्त्यावरच्या भागात असलेल्या महापालिकेच्या इमारतीत करण्यात आलेले आहे. त्यात भिकाऱ्यांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात येऊनही ते त्या ठिकाणी थांबत नाहीत.

गोदाघाट आणि गाडगे महाराज धर्मशाळेजवळील भागातही निवाराशेडची व्यवस्था असूनही त्याचा वापर केला जात नाही. यशवंतराव महाराज पटांगण, भाजीबाजार पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपूरथळा, मुक्तेश्वर पटांगण या भागात रात्री उघड्यावर झोपतात.

काहींना वयोवृद्ध सकाळी सोडून सायंकाळी पुन्हा घेऊन जाण्याची व्यवस्था काही कुटुंबीयांकडून केली जात असल्याची चर्चाही केली जाते.

गोदाघाटा परिसरात सकाळ, दुपार आणि सायंकाळी केले जात असलेल्या अन्नदानावेळी भिकाऱ्यांच्या लांब रांगा लागतात. श्राद्ध विधीसाठी येणारे भाविक अन्नदान, वस्त्रदान, वस्तू दान करीत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिन्ही वेळी खाण्यास मिळत असल्यामुळे, तसेच पैसे मिळत असल्यामुळे केवळ वृद्धच नव्हे तर लहान मुले-मुली, तरुण भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. दान करण्यात आलेल्या वस्तूंच्या चोऱ्या, पळवापळवीमुळे त्यांच्यात अनेकदा वाद होतात.

काही वर्षापूर्वी अशाच एका वादातून भिकाऱ्याचा खून झाला होता. झोपण्याच्या वादातून एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रकार नरोत्तम भवनासमोरील गाळ्यांच्या भागात झाला होता.

पोलिस आयुक्तांचा अभिनव उपक्रम पडला मागे

मे २०१९ पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी रामकुंडावरील भिकाऱ्यांना एकत्र करून त्यांना स्वच्छ करून चांगले कपडे दिले होते. यातील काहींना समुपदेशन करून चांगले शिक्षण व काम करण्यासाठी उद्युक्त केले होते.

परंतु सुधारणाऱ्यांची संख्या केवळ बोटवर मोजण्या इतकी होती. अवघ्या काही दिवसांतच हा अभिनव उपक्रम देखील मागे पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT