वणी (जि. नाशिक) : आदिशक्ती सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) आदिमायेच्या दर्शनासाठी आलेल्या लसवंत (vaccinated) भाविकांबरोबरच १० ते ६५ वयोगटातील भाविकांना दर्शनासाठी सोडण्याबाबतच्या नियमावलीची मंगळवार पासून कडक अंमलबाजवणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र यामुळे पहिली पायरी परीसरात भाविकांची मोठी गर्दी होवून व प्रवेश नाकारलेल्या बालकांसह पालक भाविकांची थोपावून राहिलेल्या गर्दीमूळे सोशल डिस्टन्सिंगचा (social distancing) फज्जा उडून निर्बंधामूळे कोविड (Covid) प्रसाराचा धोका अधिक प्रमाणात निर्माण झाला आहे.
नवसपूर्तीसाठी भाविकांची गर्दी
सप्तशृंगी गडावर नाताळ (ता. २५) पासून सुट्या, सलग दोन दिवस आलेल्या शासकीय सुट्या, नववर्षाला निरोप, नववर्षाचे स्वागत व धनुर्मास उत्सव यासाठी गेल्या दहा दिवसांपासून दररोज कमी जास्त प्रमाणात भाविकांची गर्दी सुरु आहे. त्यात १ जानेवारी पासून भाविकांचा गर्दीचा ओघ अधिक वाढला. बरोबरच राज्यात व जिल्हयातही कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. प्रसासनाच्या आदेशानूसार सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने आज पासून भाविकांना दर्शनासाठी लसवंत असल्याचे प्रमाणपत्र व १० वर्षाच्या आतील बालकांना व ६५ वर्षावरील जेष्ठांना मंदिरात दर्शनासाठी बंदी केली आहे. याबाबतची कडक अंमलबाजवणी ता. ४ पासून देवी संस्थानच्यावतीने करण्यात आली. मंगळवार हा देवीचा वार समजला जात असल्याने आज भाविकांनी देव दर्शना बरोबरच नवसपूर्तीसाठी भाविकांची एकच गर्दी उसळली होती.
पहिल्या पायरीवर संस्थानच्या सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघून व खात्री करुन मंदिराकडे सोडण्यात येत होते. यात दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारल्याने बालक व पालकांची मोठी गर्दी पहिली पायरी परिसरात झाली होती. लहान मुलांना सांभाळण्यासाठी मुलाचे आई किंवा वडील मुला सोबत पहिली पायरी येथे थांबवून कुटुंबातील इतर सदस्य हे दर्शनासाठी जात होते. व ते दर्शन घेवून आल्यावर मुलांना सांभाळणारे पालक भाविक मंदीरात जात होते. यामूळे भाविकांना दर्शनासाठी तीन ते चार तास अधिक लागून गडावर थांबावे लागत होते. तर पाल्य समवेत थांबलेले भाविक वेळेअभावी मुलांबरोबर पहिल्या पायरीवरुन दर्शन घेवून निराश होत माघारी फिरत होते. संस्थानच्यावतीने प्रतिक्षालय व चिंतन हॉल येथे लहान मुले व त्यांच्या पालकांना थांबण्याची व्यवस्था केली होती.
''मंगळवारपासून प्रशासन व ट्रस्टने केलेल्या नियमावलींची अमंलबाजवणी करण्यास सुरुवात करण्यात आली. विना मास्क, लस न घतलेल्या भाविकांसह १० वर्षाखालील बालक व जेष्ठ नागरिकांना मंदीरात जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. लहान मुलांच्या नवसपूर्ती असलेले भाविक मंदीरात सोडण्यासाठी आर्त विनवणी करीत असले तरी ट्रस्टकडून दिलेल्या आदेशाची अंमलबाजवणी होत आहे.'' - मुरलीधर गायकवाड, पहिली पायरी कार्यालय प्रमुख, सप्तशृंगी गड
''गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यात लहान मुलांचा नवसाचे प्रमाण अधिक असते. ज्यां मुलांसाठी नवस केला त्या मुलांनाच देवी दर्शन करता येत नसल्याने अशा भाविकांमध्ये ट्रस्टच्या कडक निर्बंधामुळे नाराजी होत आहे. तसेच गडावर दर्शनासाठी आलेले भाविक गडावर अधिक काळ थांबून राहून त्यांचा अधिकच संपर्क वाढत असल्याने कोविड प्रसाराचा अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.'' - धनेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सप्तशृंगी गड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.