Cruiser car overturned in an accident on Chandwad road. esakal
नाशिक

Nashik News: शाळकरी मुलाला वाचविताना क्रूझरने तीन पलटी घेतल्या; मध्यप्रदेशातील 10 शेतमजूर जखमी

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : चांदवडहून लासलगावकडे येत असताना गायकर पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (ता.२८) सकाळी प्रवासी वाहनाच्या झालेल्या अपघातात १५ शेतमजूर जखमी झाले.

सर्व जखमींना नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (cruiser capsized three times while rescuing schoolboy 10 farm labourers injured in Madhya Pradesh Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

प्रवासी वाहन असलेल्या क्रूझर गाडी (एमपी २० टीए -६५३) या वाहनातून भुराकुवा (मध्यप्रदेश) येथील वीस मजूर शेतकामासाठी नारायणगाव पुणे येथे जात असताना मंगळवारी सकाळी लासलगाव चांदवड रस्त्यावरील गायकर पेट्रोल पंपाजवळ सायकलने लासलगावकडे जाणाऱ्या शाळकरी मुलास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून क्रुझरने तीन पलट्या घेत खड्ड्यात उलटली.

या अपघातात गोटीबाई गोंडा सोलंकी, लालसिंग सोलंकी, रेवा सोलंकी, चंदाबाई हाबडा सोलंकी, नुरीबाई छगन मोरे, नारळीबाई लालसिंग सोलंकी, सचिन गंगाराम सोलंकी (सर्व रा. भुराकवा, ता. राजपूर, जि. बडवानी, मध्यप्रदेश) जखमी झाले. शाळकरी मुलासह गाडीचालक व अजून काहींना दुखापत झाली आहे.

अपघात होताच परिसरातील नागरिक मदतीस धावून आले. लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक देविदास लाड, पोलिस नाईक कैलास महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तीन रूग्णवाहिकांद्वारे लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. नंतर या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT