Tomato grown in Aghar Khurd Shiwar. esakal
नाशिक

Tomato Cultivation: राज्यात 20 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड; गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 हजार हेक्टरने घट

जलील शेख

Tomato Cultivation : राज्यात सर्वत्र भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले. गरिबांच्या सफरचंद मानल्या जाणाऱ्या टॉमेटोने शंभरी ओलांडली आहे.

टोमॅटोचे भाव वाढल्याने गरिबांच्या भाजीतून टोमॅटो गायब झाला. गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. यंदा खरीप हंगामात राज्यात २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ती कमी आहे. गेल्या हंगामात ३७ हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली होती. (Cultivation of tomato on 20 thousand hectares in state decrease of 17 thousand hectares compared to last year nashik)

यंदा पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी ‘कसमादे’ परिसरातील विहिरींनी तळ गाठला. टोमॅटोला या हंगामातील चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या कल टोमॅटो लागवडीकडे वाढत आहे.

पावसाने हजेरी लावल्यास टोमॅटो लागवड वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वांत जास्त टोमॅटोची लागवड झाली आहे.

एप्रिल व मेमध्ये कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना टोमॅटो विकावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रारंभी या पिकाकडे पाठ फिरवली. मेमध्ये ऊन-सावलीच्या वातावरणामुळे टोमॅटो पिकांवर व्हायरस, फुलगळती या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फटका बसला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथील भाजीपाला बाजारात रोज ५०० कॅरेट टॉमेटो विक्रीसाठी येत आहे. येथील बाजारात दीड हजार रुपये प्रतिकॅरेटप्रमाणे त्याची विक्री होते. येथून प्रथम दर्जाचा टोमॅटो मध्य प्रदेश, गुजरात, परतवाडा, विदर्भ येथे विक्रीला जात असल्याचे भाजीपाला व्यापारी दिनेश वाघ यांनी सांगितले. "एप्रिल-मेमध्ये ५० रुपये कॅरेटने टोमॅटो विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपे शेतातून काढून टाकली. लागवडीपासून प्लास्टिक, तार, बांबू, सुतळी, औषध फवारणी, तोडणी मजुरी, भाडे काढणीपर्यंत एकराला एक लाखापर्यंत खर्च येतो. मात्र, उत्पन्नाची हमी नसते. या वेळी चांगला भाव मिळाला." - योगेश आहेर, टोमॅटो उत्पादक, भुसणी (ता. कळवण) "शहरात टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी असते. भाव वाढल्याने येथे स्वस्त व हलक्या दर्जाचा माल विकला जात आहे. दुय्यम प्रतीचा टोमॅटो ७०० ते ८०० रुपये प्रतिकॅरेट विक्री होत आहे."

- दिनेश वाघ, भाजीपाला व्यापारी (मालेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT