drama esakal
नाशिक

Cultural Policy : नाट्य संस्कृतीचा चेहरा बदलावा; उपनगरांमध्ये व्हावीत छोटी नाट्यगृहे

सांस्कृतिक धोरणातील अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Cultural Policy : येत्या नोव्हेंबर महिन्यात सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे, त्या अनुषंगाने नाशिकमधील उपनगरांमध्ये दीडशे प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह उभारून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

तसेच शैक्षणिक धोरणाशी सांस्कृतिक धोरणात काही गोष्टींचा समन्वय ठेवत नाट्य संस्कृतीचा चेहरा बदलावा, असे मत नाशिकमधील नाट्यगृह क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केले. (Cultural Policy nashik demand Change face of theater culture small theaters in suburbs nashik)

नाशिकमधील नाट्यगृहांमध्ये मोठी प्रेक्षकसंख्या आहे, त्याला व्यावसायिक नाटकांव्यतिरिक्त इतरवेळी प्रतिसाद मिळत नाही. पुण्यात अनेक लहान नाट्यगृह असल्याने तेथील कलावंतांना सतत व्यासपीठ मिळत आहे.

त्यामुळे पुण्यात ती संस्कृती टिकून आहे. धोरणातील नव्या बदलांमध्ये सांस्कृतिक विभागासाठी निधीची तरतूद असावी, अशीही आशा कलावंतांना आहे.

नाशिकमधील कलावंतांना संधी मिळाव्या

हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकात काम करणारे कलावंत अभिनयच करतात. परंतु सर्वच कलावंतांना संधी मिळत नाहीत. स्थानिक कलावंतांना फार क्वचित संधी मिळते. विविध अडचणींवर धोरणात सूक्ष्म पद्धतीने समावेश व्हावा.

हौशी कलावंतांना शासनाच्या विविध राज्यनाट्य, एकांकिका स्पर्धेत सवलतींमध्ये वाढ मिळावी, अशीही मागणी आहे. तसेच शहरातील विविध सामाजिक समाजमंदिरांचे हॉल, संस्थांचे हॉल कलावंतांना प्रॅक्टिससाठी उपलब्ध होण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"नाशिकमधील सांस्कृतिक धोरण बैठकीत कलावंतांनी नाट्यगृहाबाबत अडचणी सर्वाधिक सांगितल्या. मुंबई, पुण्यात व्यावसायिक नाटकांच्या संस्था आहेत, त्या नाशिकमध्ये नाहीत. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली असून, अमरावती, नागपूरला बैठक होणार आहे. जवळपास दीडशेहून अधिक अडचणी आहेत, त्यांचा धोरणात विचार होईल."

-दीपक करंजीकर, सदस्य, सांस्कृतिक धोरण रंगभूमी उपसमिती

"नाशिकमधील मॉलमध्ये चार स्क्रीन चित्रपटगृहांना असतात, त्यात नाट्यगृहही असावे. सातपूर, इंदिरानगर, पंचवटी परिसरात दीडशे प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह उभारावे. शैक्षणिक धोरण व सांस्कृतिक धोरणात समन्वय साधत शालेय विद्यार्थ्यांपासून कलेची साधना जोपासली जावी. विविध विषयांपेक्षा कलेसंदर्भातील विषय घेऊन विद्यार्थ्यांना संधी द्यावी."-सचिन शिंदे, दिग्दर्शक

"शासनाच्या अख्यत्यारीत असलेल्या नाट्यगृहांमध्ये अद्ययावत सुविधा व्हायला हवी. प्रकाशयोजना व ध्वनियोजनेत डिजिटायझेशन असावे. नाट्यगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक असून, नाट्यशास्त्रातील विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळावी. सांस्कृतिक धोरणात नाट्य कलावंत, नाट्यगृहांना निधी मिळावा."

- ईश्वर जगताप, प्रकाश योजनाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT