money  esakal
नाशिक

35 बँकांचे पैसे ग्राहकांना मिळणार घरपोच! 'या' मिळणार सुविधा

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : जिल्ह्यातील पहिली सहकारी बँक (first co-operative bank in district) असलेल्या 'या' बँकेने स्वातंत्र्यदिनापासून आरएनएफआय (RNFI) सेवेला सुरवात केली आहे. तसेच, मायक्रो एटीएमची (micro atm) सुविधा कार्यान्वित केली असून, याद्वारे ३५ बँकांतील पैसे ग्राहकांना थेट घरपोच मिळू शकणार आहे. नेमकी कोणती बॅंक अशी सुविधा देत आहे...वाचा सविस्तर...

ग्राहकहिताचे उद्दिष्ट लक्षात ठेवून बँक नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. जिल्ह्यातील पहिली सहकारी बँक असलेल्या येवला मर्चंट को-ऑप. बँकेने स्वातंत्र्यदिनापासून आरएनएफआय सेवेला सुरवात केली आहे. तसेच, मायक्रो एटीएमची सुविधा कार्यान्वित केली असून, याद्वारे ३५ बँकांतील पैसे ग्राहकांना थेट घरपोच मिळू शकणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अरुण काळे, उपाध्यक्ष सूरज पटणी यांनी दिली. बँकेचे सर्व कामकाज सुरळीत सुरू झाले असून, सोने कर्ज वाटपातही पूर्ववतपणा आला आहे. ग्राहकहिताचे उद्दिष्ट लक्षात ठेवून बँक नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. त्याचाच भाग म्हणून आरएनएफआय सेवेला सुरवात केली आहे. ३५ बँकेतील पैसे ग्राहकांना आपल्या बँकेमार्फत थेट काढता येऊ शकतील. त्यासाठी ग्राहकांनी ९२७०९५७०९५ या क्रमांकावर कॉल केल्यास बँक कर्मचारी घरी येऊन त्यांना पेमेंट देणार आहे.

सोने कर्ज वाटपातही पूर्ववतपणा

बँक ग्राहकांना अतिशय अल्प दरात आरटीजीएस,एनईएफटी सुविधा देत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनेतारण कर्ज सुविधाही त्वरित व अल्प व्याजदरात उपलब्ध आहे. त्यामुळेच केवळ तीनच महिन्यांमध्ये सहा कोटींपेक्षा जास्त सोनेतारण कर्ज वाटप केले असून, बँकेने एकूण २३ कोटींचे सोने तारण कर्ज वाटप केले आहे. बँकेच्या जिल्हा बँकेकडे २३ कोटीच्या ठेवी अडकल्या असून, त्या मिळताच इतर कर्ज प्रकरणेही सुरळीत होतील. बँकेची मार्च २१ अखेरची आर्थिक स्थिती भक्कम असून, ठेवींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बँकेमध्ये इतर बँकांपेक्षा ठेवीना सर्वाधिक आज ८ टक्के व्याजदर दिला जातो. तर पाच लाखापर्यंत ठेवींना विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. कर्जाची थकबाकी वसुलीसाठी बँकेने मोठ्या प्रमाणात कायदेशीर कारवाई केल्या आहेत. काही थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रियाही लवकरच अवलंबली जाणार आहे. कर्ज वसुलीही चांगली होत असून, थकबाकीदार चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे सर्व कामकाज पूर्वपदावर येत असल्यामुळे ग्राहकांनी पुन्हा सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू करावेत, असे आवाहन काळे, पटणी, मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर गौरकर, व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी केले आहे.

या मिळणार सुविधा...

आरएनएफआय योजनेअंतर्गत वीज बील, टेलिफोन बील, मोबाइल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज, विम्याचा हप्ता, रेल्वे टिकीट, विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, क्रेडीट कार्ड पेमेंट या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मायक्रो एटीएमची आधार बेस पेमेंटची सुविधा सुरू केली आहे.

योजनेत या बँकांचा समावेश...

आरएनएफआय योजनेअंतर्गत ॲक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीएफसी, स्टेट बँक, महाराष्ट्र, बदोडा, इंडिया, आंध्रा, युनियन, पंजाब, युनायटेड, ओडीसा, आयडीबीआय, फेडरल अशा सुमारे ३५ बँकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT