Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Fraud Crime: दुपटीने वाढले सायबर फ्रॉड! नोकरीच्या आमिषातून तरुणांची 4 कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंटरनेटसेवा ‘फोर-जी’कडून ‘फाइव्ह-जी’कडे जात असताना या मायाजालाचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर भामट्यांनी नाशिककरांना ऑनलाइन सहा कोटी ६२ लाखांना गंडा घातला आहे.

यात सर्वाधिक फसवणूक ही नोकरीचे आमिष दाखवून केली आहे. नाशिक सायबर पोलिसांकडे गेल्या अकरा महिन्यांत ५९ गुन्हे दाखल झाले असून, गत वर्षीच्या तुलनेत यंदा यात दुपटीने वाढ झाली आहे.

एवढेच नव्हे, तर फसवणुकीच्या रकमेतही सहा पटीने वाढ झालेली आहे. दरम्यान, पोलिसांकडून वारंवार सायबर फसवणुकीपासून सावधान राहण्यासाठी जनजागृती व प्रबोधन केले जाते, तरीही उच्चशिक्षितही सायबर भामट्यांच्या प्रलोभनांना बळी पडत आहेत. (Cyber ​​fraud increased 4 Crore fraud of youth through lure of job fraud crime nashik)

जगभर डिजिटायझेशन सुरू असताना भारतामध्ये सर्वाधिक आर्थिक फसवणूक ही सायबर फ्रॉडच्या माध्यमातून होते. देशातील एकूण आर्थिक फसवणुकीच्या तुलनेत सायबर फसवणुकीचे गुन्ह्यांचे प्रमाण ७५ टक्के आहे.

सायबर फसवणुकीचे प्रमाण कोरोनानंतर वाढले. कोरोनात ऑनलाइन आर्थिक व्यवहार वाढल्याने त्याचा फायदा सायबर भामट्यांनी उचलला आहे.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात गेल्या अकरा महिन्यांमध्ये सायबर फसवणुकीचे ५९ गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिककरांना पार्टटाइम जॉब, क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक, लॉटरी, फ्रॉड कॉल, गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल सहा कोटी ६३ लाख रुपयांचा गंडा सायबर भामट्यांनी घातला आहे.

पार्टटाइम जॉबचे प्रलोभन

सायबर भामटे सोशल मीडियावरून संपर्क साधून पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवतात. टास्क पूर्ण केल्यास चांगला आर्थिक परताव्याचे आमिष देतात.

सुरवातीस यूट्युबवरील व्हिडिओ लाइक करणे, रिव्ह्युव्ह देणे यासाठी भामटे एक ते दोन हजार रुपये संबंधितांच्या बँक खात्यात टाकून विश्वास संपादन करतात. त्यानंतर प्रीपेड टास्क पूर्ण करण्याचे सांगत नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगितले जाते.

त्यानंतर विमान तिकीट बुकिंग करणे, क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार, पैशांचे परकीय चलनात रूपांतर करणे आदी कामे सांगून नागरिकांना आभासी पगार दाखविला जातो. स्क्रीनवर काही क्षणात केलेल्या कामाचा मोबदला दिसत असल्याने लालसेपोटी अनेकजण लाखो रुपये भामट्यांना देतात.

मात्र त्यांचा परतावा फक्त आभासी असल्याने त्यांना त्याचा लाभ होत नाही. अखेर पैसे संपल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशारीतीने नाशिकमधील उच्चशिक्षितांना सायबर भामट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांना गंडा घातला आहे.

वर्ष .......... सायबर गुन्हे

२०२१ ....... ४३

२०२२ ....... २६

२०२३ ....... ५९ (नोव्हेंबरअखेरपर्यंत)

"ऑनलाइनवरून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नये. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. टास्क देऊन कोणताही परतावा मिळत नसतो. तसेच खात्री केल्याशिवाय कोणतीही गुंतवणूक करणे चुकीचे आहे. त्यातूनच फसवणूक होत असते."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

...अशी झाली फसवणूक

फसवणुकीचा प्रकार ---- दाखल गुन्हे ---- फसवणुकीची रक्कम

नोकरीचे आमिष ---- २८ ---- ३,९४,८५,१५२

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक ---- ३ ---- ७०,७३,४५५

फोनवरून गंडा ---- ७ ---- ६१,५२,७२४

केवायसीच्या बहाण्याने गंडा ---- २ ---- २६,३५,४५९

हरवलेल्या मोबाइलचा वापर करून गंडा ---- २ ---- २१,६९,०००

एनी डेस्क ॲप ---- २ ---- १८,६६,०००

गुंतवणुकीचे आमिष ---- ३ ---- १६,०७,४२७

लॉटरी-बक्षिसाचे आमिष ---- ३ ---- १४,०१,२५६

सेस्कटॉर्शन ---- १ ---- १२,४८,०००

जाहिरात ---- १ ---- ८,०९,५५५

अनधिकृत मोबाईल बँकिंग ॲक्सेस ---- १ ---- ६,९९,००६

मेट्रोमनी ---- १ ---- ६,१०,०००

ओएलएक्स ---- १ ---- ६,०५,०००

महावितरण ---- १ ---- २,१३,४९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT