Cycle Rally File Photo esakal
नाशिक

Anti Narcotics Cycle Rally: अंमल पदार्थविरोधी जनजागृतीसाठी शहरात शनिवारी सायकल रॅली!

सकाळ वृत्तसेवा

Anti Narcotics Cycle Rally : जागतिक अंमली पदार्थसेवन विरोधी दिनानिमित्ताने येत्या २५ जून ते १ जुलै दरम्यान शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘अंमली पदार्थ सेवनविरोधी जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने येत्या शनिवारी (ता. २४) शहर पोलीस व नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ६ वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. (Cycle rally on Saturday in the city for anti narcotics awareness nashik news)

गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शनिवारी (ता. २४) सकाळी सहा वाजता अंमली पदार्थ सेवनविरोधी जनजागृती सायकल रॅलीला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखविला जाणार आहे.

या रॅलीमध्ये नाशिक सायकलीस्ट असोसिएशनचे १५० तर, शहर पोलीस आयुक्तलयाच्या विविध शाखा व पोलीस ठाण्यांचे १५० अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.

सायकल रॅलीच्या माध्यमातून अंमली पदार्थविरोधी फलक-घोषवाक्यातून जनजागृती केली जाईल. सहभागींना प्रमाणपत्र तर सोडतीद्वारे पाच सायकलीस्टला सायकल हेल्मेट दिले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे असेल मार्ग

पोलीस आयुक्तालयापासून प्रारंभ - अशोकस्तंभ, घारपुरे घाट - रामवाडी - पेठनाका सिग्नल - शरदचंद्र पवार मार्केट यार्ड सिग्नल - तारवालानगर - पंचवटी पोलीस ठाणे - दिंडोरी नाका - पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅण्ड - रविवार कारंजा - रेडक्रॉस - शालिमार - सारडा सर्कल - द्वारका - काठेगल्ली - मुंबई नाका - गडकरी सिग्नल - त्र्यंबक नाका - जुने सीबीएस - पोलीस परेड ग्राऊंड येथे सायकल रॅलीचा समारोप होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT