Cycling Exercise esakal
नाशिक

Nashik News : सायकलींग हा आरोग्यदायी व्यायाम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सायकलिंग हा एरोबिक्‍स व्यायाम प्रकार असून यात प्राणवायू व फुफ्फुसांच्या शक्‍तीचा वापर करून घेणाऱ्या हालचालींचा व्यायाम होतो. त्‍यामुळे हृदय व फुप्फुस प्रणाली जोमाने कार्यरत होऊन उष्‍मांकांचे व चरबीचे ज्‍वलन केले जाते.

सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते. यात स्‍नायूंवर कमीतकमी ताण पडतो, त्‍यामुळे दुखापतीचे प्रमाण कमी असते. वजन कमी करणाऱ्या या परिणामकारक व्यायामप्रकारात नाशिकचे संपूर्ण भामरे कुटुंबीय रमले आहे. इतर नाशिककरही सायकलिंगला प्राधान्य देत आहेत, त्यामागील कारण हेच असल्याचे दिसून येते. (Cycling is a healthy exercise body gets many benefits energy reserves for day nashik news)

नाशिकमधील भामरे कुटुंबीय हे सायकलिंग हा व्यायामप्रकार अगदी आवडीने करतात. तसेच कुटुंबातील त्‍यांचा मुलगा निसर्ग भामरे हा या मागचा प्रेरणा स्‍थान आहे. भामरे कुटुंबीय सायकलींग हाच सर्वांग उत्‍तम व्यायामप्रकार अनुभवत आहेत.

रोहिणी भामरे, प्रशांत भामरे, व मुले निसर्ग व ‘ॠतू भामरे असे अख्खे कुटुंब सायकलींग हीच त्‍यांच्या निरोगी आयुष्‍याची गुरुकिल्ली मानत आहेत. मुलगा निसर्ग याने अलीकडेच कझाकिस्‍तानच्या स्‍पर्धा -२२ मध्ये ‘ आयर्न मॅन’चा किताब मिळवला. हे सारे शक्‍य झाले ते सायकलींग ही पॅशन असल्‍यामुळे. आता तो बहीण ॠतूचीही तयारी करून घेत आहे. ॠतूने 3 नॅशलन मेडल मिळविले आहेत.

लाघवम्‌ कर्मसामर्थ्‍यम्‌ दीप्तो अग्‍निर्मेदश्‍चः क्षय

विभक्‍तघनगात्रत्‍वम्‌ व्यायामादुपजायते

अर्थातः शाररिक व्यायाम केल्‍यामुळे शरीर हलके व हालचालींस सक्षम बनते. पचनशक्‍ती वाढते. स्‍थूलपणा कमी होतो. शरीर कणखर आणि बांधेसूद बनते. (अष्‍टांग हृदयम, अध्याय 2, श्‍लोक)

सायकलिंगचे फायदे अनेक

दुचाकी, चारचाकी यामुळे होणारे प्रदूषण सायकल वापराने कमी होते. ट्रॅफीक जामसारख्या समस्‍या उद्‌भवत नाही. कमीत कमी क्षेत्रफळाच्या रस्‍त्‍यावरही सायकल चालवू शकतो. सध्याच्या धावपळीची जीवनशैली, तणावपूर्वक जीवनशैलीत सायकल चालविण्याने शारीरिक व मानसिक आरोग्‍य उत्‍तम राहते. हृदय व फुफ्फुसांचे आरोग्‍य व क्षमतेत वाढ होते. फुफ्फुस मजबूत बनतात. रक्ताभिसरण चांगले होते. दिवसभराची ऊर्जा मिळते. रात्री छान झोप लागते. रक्तपेशी व त्‍वचेला पुरेसा ऑक्‍सिजन मिळाल्‍याने त्‍वचा निरोगी व तजेलदार राहते. रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्रिय होतात. मेंदूला ऑक्सि‍सीजनचा मुबलक पुरवठा होतो व पेशी अधिक सक्रिय होतात यामुळे स्‍मरणशक्‍तीत वाढ होते.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

"सायकल हा धाडसी क्रीडा प्रकार असल्‍यामुळे तसेच प्रत्‍यक्ष निसर्गाजवळ जाऊन त्‍याचे सौंदर्य अनुभवता येते, त्‍यामुळे यात गोडी निर्माण झाली."

- निसर्ग भामरे, आयर्नमॅन

"मुलाचा सायकलींगप्रती असलेली ओढ तसेच त्याची सततचे सांगणे यामुळे मीही सायकलकडे ओढली गेले. तसे मी लहानपणी शाळेत सायकलवर जायचे यामुळे पुन्हा सायकलिंग सुरू केली. आज एकही दिवस असा जात नाही की सायकलींग झाली नाही."

- रोहिणी भामरे, आई, सामाजिक कार्यकर्त्या

"भावाची सायकलप्रती असलेली आवड तसेच त्‍याचे सततचे मार्गदर्शन यामुळे मलाही सायकलींगमध्ये आवड निर्माण झाली. नॅशनल मेडल मिळाल्‍याने अजून उत्‍साहात भर पडली आहे. भावाच्या मार्गदर्शनाखाली नक्‍कीच ध्येय गाठेल."

- ॠतू भामरे, बहीण

"मुलांना क्रीडा या विषयात आवड निर्माण करावयाची असे मी व पत्‍नी रोहिणी आम्‍ही ठरविले, त्‍याप्रमाणे त्‍यांना लहानपणापासून वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराबद्दल मार्गदर्शन केले, मात्र त्‍यांना जो क्रीडा प्रकार आवडेल, तो निवडण्याचे त्‍यांना स्‍वातंत्र्य दिले. पत्‍नी आम्‍हा सगळ्यांच्या आहाराविषयी जागरूक असून त्‍याप्रमाणे आहारात कॅल्शिअम व अन्य सर्व घटकांचे प्रमाण समतोल राहील यादृष्‍टीने उत्‍तमप्रकारे काळजी घेते."

- प्रशांत भामरे, पती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT