Dada Bhuse esakal
नाशिक

Dada Bhuse : ठाणे -वडपे रस्त्याचे 30 टक्के काम पूर्ण : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : ठाणे-वडपे रस्ता २१ किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे.

रस्त्याच्या आठपदरीचे काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी आज दिले. (Dada Bhuse statement about 30 percent work of Thane Vadape road completed nashik news)

विधीमंडळाच्या अधिवेशनात भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होत असून आठपदरी रस्ता कधीपर्यंत होणार? या उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला श्री. भुसे यांनी उत्तर दिले.

श्री. भुसे म्हणाले, की भिवंडीच्या या रस्त्यात मोठ्याप्रमाणात गुदाम आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची देशात वाहतूक होत असल्याने वाहनांच्या रांगा लागत असतात. कामाच्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रस्त्याच्या डागडुजीच्या सूचना दिल्या आहेत. २१ किलोमीटर अंतरावर ५० कट होते. ते बंद केले आहेत. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला १ हजार वाहतूक वॉर्डन पुरवण्याचा निर्णय घेतला.

क्रेन, गस्ती पथक तयार करण्यात आले आहेत. अवजड वाहनांना वेळ मर्यादा ठरविण्यात येईल. तसेच लहान वाहनांना स्वतंत्र लेन उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT