नाशिक : लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली तसा सामान्यांना न्याय द्यावा. तसेच, कुटुंबाचा सांभाळ करायचा आहे, ही अट नियुक्तीपत्रात आहे, याचे भान ठेवा. जनसेवेचे साधन म्हणून नोकरीकडे पाहावे. कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून नियुक्तीपत्रे दिली आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले (dada bhuse statement about job for job seekers nashik news)
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी (ता. ९) अनुकंपा धर्तीवर नियुक्ती झालेल्या २७५ उमेदवारांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटण्यात आले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित होते.
दादा भुसे म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ हजार युवकांना नियुक्ती देण्याचा निर्णय झाला. या विषयाचा जिल्ह्यात आढावा घेताना अनेक विभागात प्रकरणे प्रलंबित होती. छत्र हरपलेल्या कुटुंबातील वारसांना नियुक्तीपत्र देण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
राज्यात नाशिक पॅटर्न अनुकरणीय ठरेल, दोन महिन्यांत नाशिक जिल्हा शून्य अनुकंपा ठरावा, अशी आशा व्यक्त करीत, श्री. भुसे यांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीला विलंब झाला, तर मुलाचे वय बाद होते, त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे नमूद केले.
महिन्यांत आणखी दोनशे नोकऱ्या
एका महिन्यात आणखी दोनशे ते तीनशे नियुक्तीपत्र दिली जातील, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, की ३६ विभागाची २७५ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली आहेत.
शासकीय नोकरीत प्रामाणिक कामकाज करावे, सामान्य व गोरगरिबांची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले. पोलिस अधीक्षक उमाप म्हणाले, की अनुकंपा तत्त्वावर भरती होते; पण त्याचे निश्चित नियोजन नसते. त्यामुळे विलंब होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.