Guardian Minister Dada Bhuse speaking in the motivational workshop of Zilla Parishad teachers, Chief Executive Officer Ashima Mittal on stage esakal
नाशिक

Dada Bhuse News: शिक्षणाचा मालेगाव पॅटर्न पुढे आणू या; पालकमंत्र्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : तालुक्यातील गोरगरीब, वंचित घटकांच्या मुलांसाठी शिक्षक पदरमोड करून काम करतात. पालकांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक शाळा नावारूपाला आल्या. शिक्षणाचा हा 'मालेगाव पॅटर्न' आपण सर्व मिळून पुढे आणूया असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Dada Bhuse statement bring forward the Malegaon pattern of education nashik)

ॲरोमा थिएटरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित प्रेरणादायी कार्यशाळेत मंत्री भुसे बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल होत्या. मंचावर शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी भारत वेंदे, राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित विक्रम आडसूळ, ज्योती बेलवले उपस्थित होते.

मंत्री भुसे पुढे म्हणाले,‘ बदलत्या काळानुसार पालकांचे योगदान शिक्षणासाठी मिळत असते. त्यासाठी समर्पण महत्त्वपूर्ण असून विकासाच्या टप्प्यात शिक्षणाला प्राधान्य देऊन काम करायचे आहे. कौळाणे ( गा) शाळेचा कायापालट हे त्याचेच उदाहरण आहे.

ग्रामस्थांच्या लोकसहभागातून देवघट शाळेची आकर्षक इमारत आदींसह काही शाळांचा नामोल्लेखही त्यांनी केला. गुणवत्ता विकास अंतर्गत प्रथम, द्वितीय तृतीय शाळेला अनुक्रमे १ लाख, ५१ हजार, २५ हजार बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली.

गटविकास अधिकारी भारत वेंदे यांनी मनोगतात तालुक्यातील शैक्षणिक बाबींचा आढावा मांडला. श्रीमती बेलवले म्हणाल्या, मनाची तयारी असली, की ध्येय साध्य होते.

शाळा बदलण्यासाठी इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य विविध उपक्रम व शालेय कामकाजाबाबत ओघवत्या शैलीतून माहिती दिली.

श्री. अडसूळ यांनी स्वतःची शाळेचे रूप कसं पालटले त्याची चित्रफिती दाखवली. बदलासाठी शिक्षकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. पालकांची जनजागृती केल्यास नक्कीच सहकार्य मिळते.

शिवडे येथील उपक्रमशील शिक्षिका ज्योती कदम यांनी पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मॉडेल स्कूल संकल्पना कशी साकारली जाते याबाबत माहितीचे सादरीकरण केले.

साजवहाळचे उपक्रमशील शिक्षक राकेश पवार यांनी शाळेतील बदल व गावाचं योगदानाची यशोगाथा सादर केली. संदीप सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. गायत्री आहेर, विद्या पाटील, ज्योत्स्ना काकळीज यांनी सूत्रसंचालन केले.

प्रभारी गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांनी आभार मानले. नांदगावचे प्रमोद चिंचोले, धनंजय कोळी, संजय कुसाळकर, साहेबराव निकम, नजीर पटेल यांच्यासह विविध गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामसेवक व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

"शिक्षणाशिवाय विकास अशक्य आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. समस्या असतील नक्कीच पण त्यावर मार्ग काढा. पालकमंत्र्यांच्या प्रेरणेतून १२८ शाळा जिल्ह्यात मॉडेल झाल्या. त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा."

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प..

शाळांचे खासगीकरण नाही

शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा देण्यासाठी दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. शाळांचे खासगीकरण होणार नसल्याची ग्वाही दिली.

शाळेच्या विज बिलाबाबत बोलताना मंत्री भुसे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना सूचित करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे बिल भरण्याची व्यवस्था करावी. यासंबंधीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी तातडीने द्यावे असेही श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT