Dahi Handi 2023 : मच गया शोर सारी नगरी रे, गोविंदा रे गोपाळा, जय जय श्रीराम अशा एक ना अनेक गाण्यांवर गोविंदा पथकांसह मंडळाचे पदाधिकारी, नागरिकांनी ठेका धरला.
महिनाभरापासून दडी देऊन बसलेल्या पावसाने सायंकाळी हजेरी लावल्यानंतर गोंविदा पथकांसह नाशिककरांचा उत्साह द्विगुणित झाला. गोविंदा पथकांनी सलामी देत उत्सुकता निर्माण केली. पावसांतच गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडली.
गोंविदा पथकांचा उत्साह दुपारपासूनच दिसून आला. नाशिककरांनी दिलेला प्रतिसादामुळे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोचला. (dahi handi festival Govinda teams celebrated Dahi Handi in rain nashik news)
कृष्णजन्माष्टमी निमित्त बुधवारी (ता. ६) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. भाजप युवा मोर्चा, पोलिस बॉइजतर्फे रावसाहेब थोरात सभागृह मैदानावर चांद्रयान ३ च्या थीमवर दहीहंडीची सजावट करण्यात आली होती.
अभिनेता चिन्मय उदगीरकर, शिल्पी अवस्थी, आमदार देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. पंचवटीतील श्रीकृष्णनगरात माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यातर्फे आयोजित दहीहंडीत नाशिककरांनी धमाल केली. म्हसोबा पटांगणावर झालेल्या दहीहंडीला नाशिककरांनी प्रतिसाद दिला.
एलईडी लाईटसच्या प्रकाशात मराठी, हिंदी, गोपाळकाल्याच्या गाण्यांवर गोविंदापथकांसह नाशिककरांनी नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. गोंविदा पथकांनी सलामी दिल्यानंतर होणार्या जल्लोषाला उधान आले. सोशल माध्यमावरील इन्फ्लूएन्सर्सच्या उपस्थितीतीने दहीहंडीच्या कार्यक्रमात उत्साह संचारला.
शिवराय वाद्यपथकाची शिवस्तुती
शिवराय वाद्यपथकातील अडीचशे वादकांनी अकरा ध्वज नाचवत शिवकालीन शिवस्तुती सादर केली. वाद्यपथकाने सादर केलेल्या मर्दानी खेळांनी नाशिककरांची दाद मिळविली. दीड तास वादन केल्यानंतर भोईराज गोंविदा पथकाने सलामी दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बाल गोंविदा पथकाने पाच थरांची सलामी दिल्यानंतर मोठ्या वयोगटातील पथकाने सात थरांची सलामी दिली. तीस फुटांवर असलेली दहीहंडी भोईराज गोंविदा पथकाने फोडत एक लाख ५१ हजारांचे बक्षीस पटकाविले.
चेतनानगर येथे दहीहंडीचा उत्साह
अनेक वर्ष दहीहंडीची परंपरा जपणाऱ्या चेतनानगर येथील श्रीकृष्ण चारिटेबल ट्रस्ट आणि सह्याद्री युवक मंडळा तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात स्थानिकयुवकांनी येथील हंडी फोडली. या दहीहंडी उत्सवाला चेतनानगर, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगरसह सिडको मधील नागरिकांनी पावसात गर्दी केली होती.
येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव रंगला. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि ट्रस्टचे संस्थापक अमोल जाधव, माजी नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे आणि सोमनाथ बोराडे यांनी या उत्सवाच्या आयोजन केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले, दत्ता पाटील, भाजप नेते दिनकर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांची विशेष उपस्थिती होती. गोविंदा पथकाला रोख पाच हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात आले. माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रथमेश विभूते, रमेश जगताप, अप्पा बाविस्कर, योगेश कापडी, शैलेश कार्ले, अमेय जाधव, मानसी जाधव आदींनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.