money esakal
नाशिक

Nashik Tribal Dept : रोजंदारी व तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; रोजगारापासून मुकणार?

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tribal Dept : सध्या शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगारी हा एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला असून नाशिक आदिवासी विकास विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून रोजंदारी व तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर न घेण्याच्या आदेश आदिवासी विकास विभागाने काढले आहे. (Daily and hourly employees will lose employment from coming academic year nashik news)

पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे, की आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळा वसतीगृहामध्ये सन २०२३-२०२४ च्या शैक्षणिक सत्रापासून एकही कर्मचारी रोजंदारी तासिका तत्त्वावर घेण्यात येऊ नये.

आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहामध्ये बाहयस्रोताद्वारे मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबत नमुद केले आहे. सर्व गृहपाल व मुख्याध्यापक यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे, की सन २०२३ २०२४ या शैक्षणिक सत्रापासून एकाही कर्मचाऱ्यास रोजंदारी व तासिका तत्त्वावर हजर करून घेण्यात येऊ नये.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्याध्यापक अथवा गृहपालाने परस्पर एखाद्या कर्मचाऱ्यास हजर करून घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित गृहपाल मुख्याध्यापक यांची राहणार आहे. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी सदर पत्र काढले आहे.

"आम्हा शिक्षकांवर आदिवासी विकास विभाग अन्याय करत आहे आदिवासी विकास मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना आम्ही लेखी निवेदन पाठवले आहे. आमच्या कुटुंबाचा व उदरनिर्वाहाचा विचार व्हावा आम्हाला रोजगार कायम मिळावा, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयावर आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी आंदोलन करणार आहोत." -उत्तमकुमार कामडी, कंत्राटी शिक्षक (ता.पेठ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT