onion sakal
नाशिक

कसमादे पट्ट्यात पूर्वमोसमीचा तडाखा; भाजीपाला, कांद्याचे मोठे नुकसान

रोशन खैरनार

जिल्ह्यातील कसमादेसह दिंडोरी आणि सिन्नरच्या काही भागात शुक्रवारी (ता. २८) वादळी वारे अन् पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. भाजीपाला आणि साठविलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले.

मालेगाव, सटाणा (जि. नाशिक) : जिल्ह्यातील कसमादेसह दिंडोरी आणि सिन्नरच्या काही भागात शुक्रवारी (ता. २८) वादळी वारे अन् पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. भाजीपाला आणि साठविलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली, तर काही भागात वीजतारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. (damage to crops in nashik district due to wind and pre-monsoon rains)

सटाण्यात कांद्याचे नुकसान

सटाणा परिसरात दुपारी तीननंतर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले. वाऱ्यामुळे सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर शहरालगत रावळगाव फाट्याजवळील कांदा व्यापारी श्रीधर कोठावदे यांच्या आर. के. ट्रेडर्समधील कांद्याची शेड भुईसपाट झाल्याने शेडमधील हजारो क्विंटल कांदा ओला झाला. शेडलगत असलेली बाळासाहेब बच्छाव यांची चहा व किराणा टपरी शेडखाली दबली गेली. टपरीच्या आडोशाला उभ्या असलेल्या दोन व्यक्ती यातून बचावल्या. सटाणा बाजार समितीत व्यापारी गोकुळ शिरोडे यांची कांद्याची शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा ओला झाला. वादळी वारा आणि मुसळधार पावसात तालुक्यात ठिकठिकाणी घरांवर व रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली, तर काही ठिकाणी उंच झाडे वीजतारांवर कोसळून तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते.

वाऱ्यामुळे शेतशिवारातील विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी खंडित झाला होता. सटाणा शहर, मोरेनगर, सटाणा महाविद्यालय परिसर, सावकी फाटा, ठेंगोडा, लोहोणेर, जुनी शेमळी, ब्राह्मणगाव, लखमापूर, यशवंतनगर, औंदाणे, तरसाळी, मुंजवाड, खमताणे, चौंधाणे, कंधाणे, जोरण, किकवारी, कऱ्हे, कौतिकपाडे आदी गावापर्यंत वादळी वारा आणि पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे मे महिन्यात लागवड झालेल्या टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गवार, भेंडी, वांगे, वाल, शेवगा व इतर भाजीपाला तसेच पशुधन चारा पिकांना जोरदार फटका बसल्याचे चित्र आहे. काही शेतकऱ्यांचे या पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT