Damage to vehicles in Dhongdenagar  esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिकरोड हादरले! धोंगडेनगर परिसरात चारचाकी वाहनांचे नुकसान; 3 दिवसांत 3 मोठ्या घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिक रोड परिसरात गुन्हेगारीचे ग्रहण अद्यापही सुरूच असून, कोयता गॅंगने धोंगडेनगर येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून तोडफोड करून नुकसान केले आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Damage to cars in Dhongde Nagar area nashik road nashik crime news)

विहितगाव येथे दोन गुंडांनी हातात कोयते घेऊन सोमवारी (ता. २४) मध्यरात्री दहशत निर्माण करून दुचाकी व चारचाकी असे १५ गाड्यांचे नुकसान केले होते. या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी काही तासांतच दोन संशयितांना अटक केली.

दरम्यान, ही घटना ताजी असताना धोंगडेनगर परिसरातील राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील बंगल्यासमोर रहिवाशांनी आपल्या चारचाकी गाड्या पार्किंग केल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी कोयता व लोखंडी शस्त्रांनी नामदेव गाढवे, वरिष्ठ पोलिस अधिकारी मधुकर कड, गणोरे व राऊत यांच्या चारचाकी (एमएच १५, सीएम ०७११), (एमएच १५, एचवाय ००३३), (एमएच १५, एफएफ २३२७), (एमएच १५, एचयू ३०८७) या वाहनांचे नुकसान केले.

संबंधित घटना स्थानिक नागरिक, तसेच माजी नगरसेवक रमेश धोंगडे, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते अतुल धोंगडे यांना समजताच त्यांच्या सहकाऱ्यांसह ते तातडीने जमा झाले. त्यांनी टोळक्याला अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु टोळके फरारी होण्यात यशस्वी ठरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपनगर पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी टोळक्याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात नाशिक रोड परिसरात गेल्या तीन दिवसांत तीन मोठ्या घटना घडल्या असून, नाशिक रोड हादरले आहे. गुंडगिरी केव्हा संपुष्टात येणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

विहितगाव प्रकरणी उपनगर पोलिसांनी दोन आरोपींना तत्काळ अटक केली. बोधलेनगर खून प्रकरणातील चार आरोपींनासुद्धा पोलिसांना अटक करण्यात यश आले, मात्र गुन्हेगारांवर याचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही. २४ तासांत पुन्हा तोडफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त आनंदा वाघ. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांनी भेट दिली. माजी नगरसेवक रमेश धोंगडे, अतुल धोंगडे, शिवा धोंगडे आदींनी समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT