Peth road washed away in the first rain. esakal
नाशिक

Monsoon Road Damage: एक-दोन पावसातच पेठ रोडची दैना! स्थानिक नागरिक, वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Road Damage : पेठ रोडवरील राऊ हॉटेल ते तवली फाटा रस्ता प्रशासकीय कार्यकाळात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आला. पहिल्याच पाऊस पडताच रस्ता उखडण्यास सुरवात झाल्याने या रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा आहे हे समजले. यंदा आतापर्यंत फक्त तीन दिवस शहरात पाऊस पडला.

इतक्या कमी पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडल्याने स्थानिक नागरिकांना धुळीचा आणि वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Damage to Peth Road in one or two rains Displeasure among local citizens motorists nashik)

नाशिकहून गुजरातकडे पेठ मार्गे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात लहान- मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच या भागात महापालिका हद्दीत नवीन वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे.

या भागातील नागरिक दैनंदिन कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून, तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वाहनाने प्रवास करत असतात.

गेले वर्षभर हा रस्ता खड्डेमुक्त व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी तीन ते चार वेळेस जनआंदोलन छेडत रास्ता रोको केले होते.

या वेळी काही आंदोलकांवर पोलिसांत गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. रस्ता रोको आंदोलनानंतर आंदोलक आणि महापालिकेचे शहर अभियंता यांच्यात पोलिसांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली होती.

त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर कामासाठी ज्या ठेकेदाराला काम दिले होते, त्या ठेकेदाराने चार पाच महिन्यांपूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजवित काम पूर्ण केले होते. परंतु गेल्या आठवड्यात तीन दिवस शहरात पडलेल्या संततधार पावसामुळे बुजविले खड्डे पुन्हा एकदा दिसू लागले.

खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालक खड्डे वाचवत आपले वाहन चालवत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात घडत आहे.

तीन दिवस पडलेल्या पावसामुळे जर असे बुजविलेले खड्डे पुन्हा दिसत असतील तर ठेकेदाराने कशा पद्धतीचे काम केले याची चौकशी करत ठेकेदारावर तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT