The river Dev at Devpur has dried up. esakal
नाशिक

Nashik Rain Update: सिन्नर परिसरात बंधारे, विहिरी कोरड्याठाक; जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : सिन्नर शहरापर्यंत पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरी लावली असून पूर्व भागातील खोपडी या गावाच्या पुढे पावसाचे थेंबही नाही शेतकरी राजा चिंताग्रस्त झाले आहे.

सिन्नर तालुक्यातील परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. असे असले तरी अजूनही या पावसाने जमिनीची भूक भागली नाही. परिणामी, परिसरातील बंधारे आणि विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत.

आताच पूर्व भागातील अनेक भागात पावसाचे जसे पाहिजे तसे पाऊस नसल्याने बळीराजा चिंता ग्रस्त झाला असून . बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. (Dams and wells in sinnar area are dry due to no heavy rainfall nashik news)

पूर्व भागातील देव नदी कोरडी ठाक पडल्याने विहिरींचे पाणीही आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते का अशी वेळ आता म्हणायचे आली आहे. कारण त्यावर असलेले ओढे, नाले अद्याप कोरडे ठणठणीत आहेत.

विहिरींच्या पाणीपातळीत किंचितदेखील वाढ झाली नाही. त्यामुळे आता पेरणी जरी केली तरी पावसाने पुन्हा उघडीप घेतल्यास पिकांना पाणी द्यायचे कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.

पूर्व भागातील देव नदी कोरडी टाक....

पश्चिम भागात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने भोजापुर धरण 33 टक्के व बोरखिंड धरण भरल्याने तेथील बळीराजाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे. पण पूर्व भागांत पाऊसही नाही व विहिरींचे पाणीही आटलेले आहे.

या चिंतेने बळीराजा चिंतातूर झालेला असून. एका मागून एक दिवस जात असताना रोज पावसाची चिंता बळीराजाच्या कुटुंबासह सर्वांना लागलेली आहे. त्यात कांदे चाळीत सडलेले असून शाश्वत पिकांना भाव नाही व आर्थिक विवेंचनेत पहिले पिकांसाठी घेतलेले कर्ज या सर्व आर्थिक विवंचनेत बळीराजा गुंतलेला आहे.

यातून पर्जन्य देवतेने कृपादृष्टी करावी अशी हाक आता पूर्व भागातील प्रत्येक गावात बळीराजा देत आहे.

रोज सकाळी गावातील पारावर सर्व नागरिक एकत्र येत पिकांबद्दल चर्चा करीत आहे .त्यात पाऊसही नाही व विहिरी व बंधारे नदी यांना पाणीही नाही यामुळे सर्वीकडे शांतता निर्माण झाली असून. पुढील दिवस कसे जातील अशा विवांचनेत सर्वजण आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चाऱ्याचा प्रश्न झाला गंभीर

पाऊस लांबल्याने दिवसेंदिवस जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. साठवून ठेवलेला सुका चारा आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे चढ्या दराने हिरवा चारा खरेदी करावा लागत आहे.

सध्या उसाच्या एका मोळीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसायदेखीलअडचणीत सापडला आहे.

पावसा अभावी बळीराजा चिंता तुर...

"सिन्नर तालुक्यातील अनेक गावात शेती व्यवसाय बरोबरच दुग्ध व्यवसाय हा असून अनेक कुटुंब या दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे शेतातील पिकांवर पाणी नाही त्यात पशुधनासाठी लागणारे चारा व ढेप साठी पैसे उसनवार घेण्याची वेळ बळीराजावर येत असून अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने बळीराजा हातबल झालेला आहे. डाळिंब व टोमॅटो पिकांसाठी बाहेरून पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे तसेच सिन्नर तालुक्यात दोन-तीन गावात वाड्यावर टँकर सुरू असून यावर्षी पाऊस सगळीकडे पडत असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंता तुर झालेला आहे."

- विजय सूर्यभान गडाख, माजी पंचायत समिती सदस्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT