Bham Dam (at Igatpuri): Due to intense heat, the water sources in small ponds including dams are on the verge of drying up, the dead stock in Bham Dam. esakal
नाशिक

Nashik News : इगतपुरी तालुक्यात धरणे कोरडेठाक; जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या तीन महिन्यापासून धरणांच्या पाण्यावर कडाक्याच्या उन्हाळ्याचा सामना करणाऱ्या इगतपुरी तालुक्याला पावसाने सलग तिसऱ्या वर्षीही हुलकावणी दिली आहे.

पारंपारीकतेनुसार जून महिन्याच्या ७ किंवा ८ तारखेला येणाऱ्या मोसमी पावसाचे वातावरणाच्या लहरीपणामुळे वेळापत्रक बिघडल्याने सलग तिसऱ्या वर्षीही हुलकावणी दिली आहे.

त्यातच धरणांचा पाणीसाठाही जलद गतीने होणाऱ्या बाष्पीभवनाने आटत आल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Dams dry up Igatpuri taluka Waiting for Monsoon Water issue with green fodder for animals on air Nashik News)

उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने, विहिरी व कूपनलिकांचे पाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. ‘रोहिण्या’ कोरड्या गेल्या असून आता शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. ‘मृगा’ ची ते चातका सारखी वाट पाहात आहेत.

२५ मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला तर मोठा पाऊस पडतो, मात्र मृग नक्षत्र गुरुवारी (ता. ८) सुरू झाल्यानंतरही पावसाने हजेरी लावलेली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात किरकोळ व भाजीपाल्याची पिके आहेत.

उन्हाची तीव्रता कमी होण्याऐवजी वरचेवर वाढतच आहे. पावसाने ओढ दिल्याने व योग्य अंदाज नसल्याने हिरव्या चाऱ्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. पाणी कमी पडू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिके सोडून दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकरी खरिपासाठी सज्ज

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो, मात्र उन्हामुळे दूध उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहे.

शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, उडीद यासह अन्य कडधान्य पेरणीसाठी जमिनी मशागती करून तयार ठेवल्या आहेत. पाऊस पडल्यावर बियाणाला मागणी वाढेल यासाठी कृषी केंद्र चालकांनी तूर, सोयाबीन, उडीद यासह मका बियाणे खरेदी करून ठेवले आहे.

तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा (आकडे टक्केवारीत)

दारणा : ३२

भावली : ९

मुकणे : ३९

वालदेवी : २१

कडवा : २२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT