Kalaram Mandir esakal
नाशिक

Nashik News : काळाराम मंदिरात काळाकुट्ट अंधार; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : पुण्यभूमी नाशिकनगरीचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत चार ते पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, नाताळ सुट्टीनिमित्त परराज्यातून मोठ्या संख्येने आलेल्या शेकडो भाविकांना देवदर्शन करून अंधारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

या प्रकारामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अशा परिस्थितीत दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री काळाराम मंदिराचे व्यवस्थापन साध्या जनरेटरसारखी पर्यायी व्यवस्था करू शकत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. (Darkness in Kalaram Temple without Electricity Neglected by management Nashik News)

सध्या नाताळनिमित्त शासकीय निमशासकीय कार्यालयांसह काही शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. यामुळे परराज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देवदर्शनासाठी नाशिक नगरीत हजेरी लावत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे. खासकरून नाशिकमध्ये येणारे भाविक पंचवटीतील देवदर्शनाला महत्त्व देत असल्याने गोदाघाटासह कपालेश्वर, श्री.काळाराम मंदिर, तपोवन या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी होत आहे.

भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे नाशिकची आर्थिक उलाढालही वाढते. दुसरीकडे मात्र दोन ते तीन दिवसांपासून पंचवटी परिसरात सायंकाळच्या वेळीच विजेचा लपंडाव होत असून, रात्रीचे वेळी दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे मंदिरांमध्ये भाविकांना देवदर्शन उरकून अंधारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

भक्त भविकांसोबत महिलांसह लहान मुले, वयोवृद्ध नातेवाईक असल्याने अंधारात काही बरंवाईट घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय हजारो रुपये खर्च करून मोठ्या श्रद्धेने आणि अपेक्षेने आलेल्या भाविकांवर अशाप्रकारे अंधारात उभी राहण्याची वेळ येत असेल तर प्रत्येक नाशिककरांसाठी ही बाब मान खाली घालायला लावणारी आहे. विशेष म्हणजे काळाराम मंदिरासारखे एवढे मोठे संस्थान मध्ये मंदिर परिसरात लाइट सुविधा उपलब्ध करणे कामी साधे जनरेटर उपलब्ध करू शकत नाही, हे तर नाशिककर म्हणून फारच अपमानास्पद आहे.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

महावितरणची यंत्रणा आऊटऑफ कव्हरेज

पंचवटीतील काळाराम मंदिर, शिवाजी चौक, प्रताप सिंह चौक तसेच सितागुंफा या भागात वीज पुरवठा खंडित होता. या बाबत महावितरणचे पंचवटी विभागाचे अधिकारी यांना दूरध्वनी संपर्क केला असता बोलणे होऊ शकले नाही.

"सद्यःस्थितीत काळाराम मंदिरात जनरेटरची सुविधा ही फक्त गाभाऱ्यात वीज पुरवठा सुरू राहतो, मंदिर परिसरात नसतो. मंदिर परिसरात सोलर सिस्टिम बसविण्यात येणार आहे .त्या अनुषंगाने पुढील कामकाज सुरू लवकरच ते कार्यान्वित करू."

धनंजय पुजारी, विश्वस्त, काळाराम मंदिर

"पंचवटी भागात अनेक देवी देवतांचे मंदिर आहे या ठिकाणी नेहमीच फक्त भाविक व पर्यटकांची गर्दी असते या कारणामुळे महावितरणने पंचवटी भागात २४ तास वीज पुरवठा कसा देता येईल, याचे नियोजन करावे जेणेकरून एखादी मोठी घटना होण्याचे टळेल."

दीपक वाघ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT