darna dam esakal
नाशिक

Darna Pipeline Scheme : दारणा धरण थेट पाइपलाइन योजनेला ‘खो’; अमृत दोन योजनेच्या पहिल्या टप्प्यात वगळले

सकाळ वृत्तसेवा

Darna Direct Pipeline Scheme : नाशिक रोड भागात थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत दोन योजनेत प्रस्तावित करण्यात आलेल्या दारणा धरणातून थेट पाइपलाइन योजनेला खो मिळाला आहे.

अमृत दोन योजनेच्या पहिल्या टप्प्यात थेट पाइपलाइन योजना वगळण्यात आली आहे. नाशिक शहराला गंगापूर दारणा व मुकणे या तीन धरणातून पाणीपुरवठा होतो. (Darna Dam postpone Direct Pipeline Scheme Amrit 2 omitted in first phase of scheme nashik news)

दारणा धरणातून होणारा पाणीपुरवठा मुख्यत्वे नाशिक रोड विभागासाठी वापरला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दारणा धरणातून नाशिक रोड साठी २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले जाते.

धरणातून पाणी उचलण्यासाठी चेहेडी येथे महापालिकेकडून पंपिंग स्टेशन स्थापन करण्यात आले आहे. पंपिंग वरून पाणी उचलून जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून पाणीपुरवठा होतो. मात्र, वालदेवी नदीच्या वरच्या बाजूला आर्टिलरी सेंटरच्या बाजूने नाले मिसळत असल्याने पाणी प्रदूषित होते.

चेहेडी पंपिंग स्टेशनमधून पाणी उचलल्यानंतर अळीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारीनंतर येथून पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून नाशिक रोड भागात सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.

दूषित पाणीपुरवठ्याची अडचण लक्षात घेऊन महापालिकेने अमृत दोन योजनेत दारणा धरणातून थेट पाइपलाइन टाकून नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून नाशिक व भागात पुरविण्याचे नियोजन केले. त्यासाठी थेट पाईपलाईनच्या २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

परंतु, अमृत दोन योजनेत निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आता अमृत दोनच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीतून थेट पाइपलाइन योजनेसाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न आहेत. दरम्यान, थेट पाइपलाइन योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यासाठी तांत्रिक मान्यता शुल्क दोन कोटी आठ लाख व सल्लागार शुल्क दोन कोटी ५३ लाख अदा करण्यासाठी महासभेने मंजुरीदेखील दिली. परंतु, या प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळाल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामदेखील लांबणीवर पडणार आहे.

या कारणांमुळे निधीवर फुली

अमृत दोन योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेकडून ३२५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण केंद्राच्या क्षमता वाढीसाठी अडीचशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दोन्ही प्रकल्पांना निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धारणा धरणातून थेट पाइपलाइन योजनेसाठी निधी मंजूर झाला नाही, हे महत्त्वाचे कारणे असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT