Pankaja Munde Dasara Melava : लोकनेते (कै.) गोपीनाथजी मुंडे यांनी तीर्थक्षेत्र भगवानगड येथे सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे.
यंदाचा मेळावा सुपे सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मंगळवारी (ता. २४) होईल. शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाल्यावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. (Dasara melava led by Pankaja Munde is determined for success nashik news)
मेळाव्याला दरवर्षीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच झाली. दसरा मेळावा हा कोणत्या राजकीय पक्षाचा नसून, दसरा मेळाव्याचे मुख्य प्रयोजन समाजातील उपेक्षित, शोषित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळेच दसरा मेळावा हा केवळ मेळावा नसून, एक सामाजिक चळवळ आहे.
त्यामुळे या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केले.
शिवशक्ती परिक्रमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बहुजनांना दिशा देण्यासाठी हा मेळावा असल्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गामणे यांनी सांगितले. मेळाव्याच्या नियोजनासाठी तालुका व गावनिहाय बैठका सुरू असल्याचे युवा नेते उदय सांगळे यांनी सांगितले.
बैठकीस आमदार किशोर दराडे, सुहास कांदे, विक्रांत चांदवडकर, डी. के. जगताप, बाळासाहेब वाघ, प्रकाश घुगे, सचिन दराडे, गणेश धात्रक, गोरख बोडके, विक्रम नागरे, विशाल पालवे, सुदाम ढाकणे, शरद बोडके, गोविंद घुगे, साहेबराव आव्हाड, वाल्मीक सांगळे, पी. आर. गिते, दामोदर मानकर, नारायण काकड, मनीषा बोडके, पुष्पा आव्हाड, प्रल्हाद आप्पा काकड, वसंतराव विंचू आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.