Data Entry Operator esakal
नाशिक

Data Entry Operators Recruitment : डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्तीच्या सूचनेला हरताळ!

सकाळ वृत्तसेवा

Data Entry Operators Recruitment : राज्यातील महापालिकांमध्ये तीस डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करण्याच्या सूचना देवूनही नियुक्ती न झाल्याने तीस कर्मचाऱ्यांचे काम चार ते पाच कर्मचाऱ्यांना नियमित कामे सांभाळून करावे लागत आहे. (Data Entry Operator Recruitment Notice neglected by nmc nashik news)

कोरोनाकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेऊन डाटा एंट्री ऑपरेटर्स नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक महापालिकांना तीस डाटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त करण्यास परवानगी दिली आहे.

ऑनलाइन बेडची माहिती देणे, सांख्यिकी तपशील गोळा करणे, पोर्टलवर संकलित डेटा अपडेट करणे आदी प्रकारची कामे देण्यात आली. परंतु कोरोना प्रभाव कमी झाल्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरला सेवामुक्त करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे आता कामावरून कमी करण्यात आलेल्या ऑपरेटरची चणचण भासत असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नियमित कामे सांभाळून माता बाल संगोपन, रूग्ण कल्याण समिती, प्रधानमंत्री मातृवंदन योजना आदी प्रकारची कामे करावी लागत आहे.

प्रत्येक महापालिकेला किमान ३० डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करणे बंधनकारक असताना नियुक्ती केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१०६ प्राथमिक आरोग्य केंद्रातही एक वैद्यकीय अधिकारी, एक स्टाफ नर्स, एक मदतनीस व शिपाई असे चार पदे भरणे अपेक्षित आहेत. परंतु तेदेखील भरले जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT