On the occasion of Datta Jayanti on Tuesday, Ekmukhi Datta Mandir was decorated with leaves and flowers, queues for darshan.  esakal
नाशिक

Datta Jayanti 2023 : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! लहान- मोठ्या मंदिरांत गर्दी

गोदाघाटावरील प्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिरासह शहरातील लहान-मोठी दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

सकाळ वृत्तसेवा

Datta Jayanti 2023 : गोदाघाटावरील प्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिरासह शहरातील लहान-मोठी दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

एकमुखी दत्तमंदिरात भल्या पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. (datta jayanti 2023 celebrated on small and large temple in city nashik news)

सायंकाळी सव्वासहा वाजता श्री दत्त जन्मोत्सव भाविकांच्या प्रचंड उत्साहात पार पडला. तत्पूर्वी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एकमुखी दत्ताचे दर्शन घेत पूजन केले. एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार (ता. १९) पासून श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. २ जानेवारीला उत्सवाचा समारोप होत आहे.

या कालावधीत रोज दत्तनाम सप्ताह, पारायण, गायन, कीर्तन, दत्तयाग, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्ताने गत आठवड्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनार्थ २४ तास खुले ठेवण्यात आले आहे. उत्सव काळात रोज सकाळी आठ ते बारादरम्यान श्री गुरू चरित्र, श्री नवनाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात भजन, कीर्तनासह गीत गायनाचा समावेश आहे. सायंकाळी भाविकांच्या अलोट उत्साहात व दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसरात प्रसाद, खेळणीसह विविध खाद्यपदार्थांची दुकाने सजली असून चिमुरड्यांनी खेळणीसह खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

शहरातील मुख्य एकमुखी दत्त मंदिरासह शहरातील लहान- मोठ्या दत्त मंदिरांसह श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा मंदिर, दत्तगुरूंचे निस्सीम भक्त सदगुरू ढगे महाराज मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर आदी ठिकाणी श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामतीर्थावरील साईकिरणधामसह अन्य साईबाबा मंदिरात साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी छपन्न भोग नैवेद्य

श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीपर्यंत मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सात वाजता श्रींचा नामकरण सोहळा पार पडेल. यावेळी श्रींना छपन्न प्रकारचे नैवेद्य (भोग) अर्पण करण्यात येईल. रात्री नऊ वाजता महाआरती तसेच पालखी सोहळा रंगेल.

शुक्रवारी (ता.२९) सकाळी साडेनऊ वाजता श्री दत्त यागास प्रारंभ तर दुपारी बाराला पूर्णाहुती होईल. १ जानेवारीला महाप्रसाद, तर २ जानेवारीला सायंकाळी ५ ते ९ यावेळेत महापूजा, गोपालकाल्यानंतर उत्सवाची समाप्ती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT