नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यभरातून विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली जात आहे. आत्तापर्यंत अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी विद्यापीठाने नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत विनाविलंब शुल्क ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. (Deadline for admission in YCMOU extended till 15th September Nashik Latest Marathi News)
दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या नोंदणीला ६ जुलैपासून सुरवात करण्यात आली होती. बुधवारी (ता.३१) नियमित शुल्कासह नोंदणीची मुदत संपत असताना, या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाचे बी.एड., बी.एड.(विशेष शिक्षणक्रम) आणि कृषी शिक्षणक्रम हे अभ्यासक्रम वगळून अन्य सर्व शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणीसह प्रवेश निश्चितीची प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे. आत्तापर्यंतच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरलेला आहे.
पुढील प्रक्रिया अशी
नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येईल. शंभर रुपये इतके विलंब शुल्कासह १६ ते ३० सप्टेंबर अशी प्रवेशाची मुदत असेल. प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यतेची मुदत ५ ऑक्टोबरपर्यंत असेल.
आत्तापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, त्यामुळे नियमित शुल्कासह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा.
-डॉ. प्रकाश देशमुख, संचालक, विद्यार्थी सेवा विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.