Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Nashik : नाशिक-मुंबई महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आजअखेरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार आज (ता.३१) राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक साळुंखे, पिक इन्फ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग यांनी श्री. भुजबळ यांची भेट घेऊन ६ नोव्हेंबरपर्यंत महामार्ग खड्डेमुक्त करण्याची ग्वाही दिली. त्याचक्षणी ही मुदत न पाळल्यास आता कुणालाही आम्ही बोलावणार नाही, तर महामार्गाची डागडुजीची जबाबदारी असलेल्या ठेकेदार कंपन्यांकडे आम्ही प्रेमाने जाऊ अशा शब्दांमध्ये श्री. भुजबळ गरजले. (Deadline till November 6 to clear potholes on Nashik Mumbai highway Nashik Latest Marathi News)

श्री.साळुंखे म्हणाले, की २१ ऑक्टोबरला महामार्गाची पाहणी श्री.भुजबळ यांच्यासमवेत केली होती. त्यानंतर महामार्गाच्या डागडुजीला सुरवात झाली. पण नंतर पाऊस सुरु झाला. त्यानंतर दिवाळीत मजुरांनी सुटी घेतल्याने वडपे ते पिंपळगाव बसवंतपर्यंतचे डागडुजीचे आणि खड्डेमुक्त करण्याचे काम येत्या सहा दिवसांमध्ये पूर्ण केले जाईल. पुढे महिनाभरात महामार्गाची इतर कामे पूर्ण केली जातील.

‘रिसर्फेसिंग’ च्या कामाबद्दल प्रश्‍नचिन्ह

महामार्गावरील खड्डे बुजविले तरीही ते तात्पुरती मलमपट्टी असेल. पाच वर्षांमध्ये महामार्गाचे ‘रिसर्फेसिंग'चे काम चांगले होणे अपेक्षित आहे. काम नीट न केल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील विभागाकडे भिवंडी बायपासचे काम आहे. त्यातच समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. म्हणूनच विधानसभेत मी मुख्यमंत्र्यांना ठाण्याच्या पुढे यावे, अशी विनंती केली होती. मध्यंतरी वाहनाने मुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले. त्याचवेळी त्यांनी महामार्गाची अवस्था पाहिली नाही का? हा खरा प्रश्‍न आहे. आता त्यांनीही लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला पुढे जावे लागेल.

टोलनाक्यावर ७ मिनिटांची मुदत

टोलनाक्यावर किती दूर वाहनांची रांग असावी, रांग अधिक असल्यावर मोफत सोडावे असा काही नियम आहे काय? अशी विचारणा श्री. भुजबळ यांनी केली. त्यावर श्री. साळुंखे यांनी नियम आहे, परंतु केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना नाही आणि महामार्गावरील वाहनांची संख्या ६० हजाराच्या पुढे जाते, अशी माहिती दिली. तसेच टोल नाक्यासंबंधी काही तक्रारी असल्यास १०३३ या हेल्पलाईनवर तक्रार देता येते, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय टोल नाक्यावर पाच ते सात मिनिटांच्या पुढे वाहने थांबणार नाहीत, याची काळजी घ्या आणि वेळ लागत असल्यास वाहने मोफत सोडा, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी केली. ही सूचना टोलनाक्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. साळुंखे यांनी दिली. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिक ते इगतपुरी दरम्यानच्या खड्यांमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मदत देण्याची सूचना श्री. भुजबळ यांनी केली. त्यावर श्री. साळुंखे यांनी तसा प्रस्ताव पाठवण्याची तयारी दर्शवली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, उद्योजक मनीष रावत, शहराध्यक्षा कविता कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अमोल नाईक, अमर वझरे, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, संतोष भुजबळ, नाना पवार, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.

गडकरी अन पवारांचे घ्यावे सहकार्य

विमानसेवा बंद पडल्याने विकासाला खीळ बसणार आहे, याविषयीचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर श्री. भुजबळ म्हणाले, की महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम झाला आहे. रोज कंपन्या

जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कितीही इच्छा असली, तरीही त्यांची शक्ती कमी पडते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जावे. महाराष्ट्राच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT