Chief Vivek Dhande while breaking the hunger strike of the sweepers who are going on for inclusion in the service by right of inheritance esakal
नाशिक

Nashik News: वारसा हक्काने नोकरी देण्यावर दिवाळीनंतर निर्णय; पालकमंत्र्याचे आश्‍वासान

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : वाल्मीकी, मेहतर, भंगी समाजातील बांधवांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळीनंतर मुंबईला कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्याने दोन दिवसापासून येथील पालिका कार्यालयाबाहेर सुरु असलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्ते यांनी घेतला. (Decision after Diwali on giving jobs by inheritance Assurance of Guardian Minister Nashik News)

वाल्मीकी, मेहतर, भंगी या समाजाला वारसाहक्काने नोकरी देण्यात यावी असा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा नोकरी मिळत नसल्याने व प्रलंबित मागण्यांसाठी वारसदार, कुटुंबातील घटक, सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पालिका कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरु होते.

गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. त्यातील रणजित आहिरे, बापू भालेकर,प्रदीप भालेकर या तिघा उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले.

नागसेन चव्हाण यांनीही उपोषणार्थीची भेट घेत त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत पालिका प्रशासनाला तोडगा काढण्याचे आवाहन केले होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करीत वाल्मीकी, मेहतर, भंगी समाजातील बांधवाना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळीनंतर तोडगा काढणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर श्री. धांडे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत पालकमंत्री यांनी दिलेली माहिती उपोषणकर्ते यांना दिली. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वारसा हक्काने नियुक्ती मिळण्यासाठी पालिकेला मार्गदर्शन करण्याचे पत्रच दिले नसल्याने उपोषणावर व आतापावेतो झालेल्या आंदोलनातून तोडगा निघू शकलेला नाही.

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय सानप, आनंद शिंदे, राजाभाऊ गूढेकर, किरण फुलारे, विकी पेवाल, सचिन गुढेकर, अरबाज बेग, राहुल गुढेकर, सुजित जगताप, हरिभाऊ भालेकर, समाधान सूर्यवंशी, रवी सानप, लखन भालेकर, नंदू सासणे, दिगंबर गुढेकर, सुनील गुढेकर आदी यावेळी उपस्थितीत होते. माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, संतोष गुप्ता, मनोज चोपडे यांनी उपोषणाला पाठींबा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT