Lasalgaoan Market Nashik
नाशिक

लासलगाव बाजार समितीत साधना, वेफकोला कांदा खरेदीसाठी परवानगी

अरुण खंगाळ

लासलगाव (नाशिक) : विंचूर येथील कृषिसाधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या वेफकोला नाफेडच्या (NAFED) वतीने ‘नोडल एजन्सी’ म्हणून परवानगी असल्याबाबत कागदपत्रांची खात्री झाल्याने या संस्थांना लासलगाव बाजार समिती (lasalgaon market committee) आवारात साधना, वेफकोला कांदा खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ४) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (decision to allow sadhana and weifco to purchase onions was taken at a meeting of the lasalgaon market committee)

कृषी साधना शेतमाल संस्थेने येथील बाजार आवारात नाफेडसाठी गुरुवारी (ता. ३) दोन वाहनांमधील कांदा खरेदीसाठी बोली लावताच व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेत काही काळ लिलाव बंद पाडले होते. नाफेडच्या परवान्याबाबत शहानिशा झाल्यानंतर कांदा खरेदीबाबत निर्णय घेण्याच्या मध्यस्थीनंतर गुरुवारी दुपारच्या सत्रातील लिलाव सुरू झाले. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सभापती सुवर्णा जगताप, संचालक रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी वर्गातर्फे नंदकुमार डागा, नितीन जैन, मनोज रेदासणी, बाळासाहेब दराडे, हेमंत राका, विवेक चोथाणी व प्रवीण कदम आणि साधना जाधव यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत कृषिसाधना शेतमाल संस्थेला नाफेडने ‘नोडल एजन्सी’ म्हणून कांदा खरेदी करण्याची परवानगी दिल्याबाबतचे अधिकृत पत्र साधना जाधव यांनी सादर केले. त्यानंतर व्यापारी प्रतिनिधींनी या संस्थेला कांदा खरेदी करण्यास हरकत नसल्याचे मत मांडले. सभापती सुवर्णा जगताप यांनी तांत्रिक मुद्दा संपुष्टात आल्याने वादावर पडदा पडला असून, शेतकरी हित साधून सर्वांनी समन्वयाने लिलावात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

तांत्रिक मुद्द्याचा शेतकऱ्यांना फटका

केवळ एका तांत्रिक मुद्द्यावर गुरुवारी उपस्थित झालेल्या प्रश्‍नावर दुपारच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू झाले. पण, वादळी पावसाने शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडले. लिलावासाठी आलेला कांदा पावसाने भिजल्यामुळे दरात फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे त्या दिवशी दुपारच्या सत्रात १५ ते २० लाखांचे नुकसान झाले. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न शेतकरी बांधव उपस्थित करीत आहेत. पुन्हा एकदा व्यापारी बांधवांच्या आडमुठ्या धोरणाचा फटका कोरोना काळात शेतकरी बांधवांना बसला.

जास्तीत जास्त २२०० रुपये दर

शुक्रवारी दोन्ही एजन्सीला परवानगी मिळाल्यानंतर विंचूर येथील कृषिसाधना संस्थेने सहा नग घेतले. त्यास कमीत कमी २००१, जास्तीत जास्त २२०१, तर, सरासरी २०५२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वेफकोने नऊ नग विकत घेतले. त्यास कमीत कमी एक हजार ९४०, जास्तीत जास्त दोन हजार १२१, तर सरासरी दोन हजार ३१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लासलगाव बाजार समितीत २७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ७०० ते दोन हजार १९१ व सरासरी एक हजार ९२५ रुपये बाजारभाव मिळाला.

बाजास समिती म्हणजे व्यापाऱ्यांची मक्तेदारी झाली आहे. ती संपवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा. बाजार समिती पदाधिकारी व संचालक यांनी आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत, याचे भान ठेवावे.

- योगेश रायते, समन्वयक, किसान क्रांती महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT