tcs esakal
नाशिक

NMC Recruitment : जुलै महिन्यात नोकरभरतीचा बार; ‘TCS’ मार्फत होणार भरती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांसाठी ‘टाटा कन्सल्टन्सी’ मार्फत भरती करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर टीसीएसकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल. अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली. (Decision to recruit through Tata Consultancy for total of 706 posts in Municipal Health Medical and Fire Department nashik news)

महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही.

नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु कोविडकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली.

त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांना भरतीचे अधिकार दिले. टीसीएस पहिल्यांदा नकार तर आयबीपीएसने महापालिकेला होकार कळविला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्तींचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार दिला. त्यानंतर टीसीएसकडे महापालिकेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला.

टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा झाल्यानंतर कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्याला महासभेची मंजुरी घेऊन टीसीएस समवेत करार करण्यात आला. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे.

प्रक्रिया पूर्ण

आगामी तीन वर्षांसाठी टीसीएस सोबत करार करताना भरतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली.

"टीसीएस कंपनी समवेत नोकरभरतीच्या करारानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी नोकर भरतीला सुरवात होईल." - मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT